ब्रम्हपुरीत आढळला दुर्मिळ रंग बदलणारा सरडा

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.11ऑक्टोबर):- प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा रंग बदलणारा सरडा तालुक्यातील चिखलगावात श्री.मयूर राऊत आणि प्रवीण कुथें यांना आढळून आला,ग्रामवासीयांनी ही माहिती ब्रम्हपुरीचे जीवशास्त्र अभ्यासक श्री.ललित उरकुडे व त्यांचे सहकारी श्रुत कुंभारे व हेमंत कस्तुरकर यांना देण्यात आली,या सरड्याला पकडून वनविभागाच्या मदतीने सुरक्षित स्थळी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले,या प्रजातीचा सरडा आढळल्याची पहिल्यांदाच नोंद झाली.

हा सरडा इतर सारड्यांसोबत संभाषण करण्यासाठी तसेच शरीराचा तापमान नियंत्रित करण्यासाठी रंग बदलतो,तसेच या सारड्याचे डोळे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतात,या सारड्याची जीभ शरीरा एवढी लांब असू शकते,मुख्य म्हणजे हा सरडा विषारी नाही मात्र अनेकदा या सरड्याला विषारी समजून मारण्यात येतो या वर जागृती करण्याची आवश्यकता आहे अशी माहिती ललित उरकुडे यांनी दिली.