सप्तशृंगी गड येथे दारूच्या नशेत तरुणांनी केली पोलिस प्रशाशनाला शिवीगाळ

25

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.11ऑक्टोबर):-नवरात्रोउत्सव सप्तशृंगी गडावर जिल्हाधिकारी यांचा आदेशाने सप्तशृंगी गडावर वाहनांना बंदि असल्यामुळे काल रात्री 2 वाजेचा सुमारास नांदुरी पोलीसगेट येथे काही तरुण व्यक्तींनी सप्तशृंगी गडावर वाहने सोडण्यास पोलीस प्रशाशनाला शिवीगाळ करून गोंधळ घालण्याचा प्रकार घडला आहे.

  पोलीस  संकटात कर्तव्य बजावताना कसलाच विचार न करता पोलीस प्रशाशन  डोक्यात अन् डोळ्यांदेखत केवळ खाकी अन् कर्तव्य ठेवून 24 तास रक्षक करत असतात मात्र काल रात्री नांदुरी येथे नावरात्रोउत्सव निमित्त आपले कर्तव्य बाजवतांना बंदोबस्त साठी आलेले पोलीस निरीक्षक व
पोलीस कर्मचारी यांना अरेरावांची भाषा वापरून आमची गाडी सप्तशृंगी गडावर सोडा व शिवीगाळ करून मालेगाव तालुक्यातील आठ ते दहा जणांनी कायदा सुव्यवस्था उल्लंघन करून अपमानस्पद निंदनीय घटना घडली आहे या संदर्भात पोलीस प्रशाशनाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र मध्यधुंद नशेत असलेले तरुण युवकांनी शिवीगाळ व अंगावर येऊन मारहाण करण्याचा कृत्य केल्याने या ठिकाणी आर.सी.पी पथक दाखल होताच तरुणांनी पळ काढला परन्तु पोलीस स्थानकात वादविवाद बद्दल नोंद केली आहे.आई सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविक भक्तांनी पास हे फक्त ग्रामस्थ ,शासकीय अधिकारी व महापूजा घेणारे भाविक व ग्रामस्थ यांचासाठी तहसीलदार कार्यलयात असतात आणि गडावर जाणारी प्रत्येक वाहनाचा पास असल्यावर गडावर जाण्यास परवाना बघूनच आम्ही वाहने सोडतो परंतु दर्शनाला  येणारे  भाविक भक्तांनी पोलिसांना सहकार्य करावे