वरुड येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या विकास कामाचे आ. देवेंद्र भुयार यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न !

28

🔹आ. देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिला ४८ लक्ष ९६ हजार रुपयांचा निधी !

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.11ऑक्टोबर):- शहरातील प्रभाग क्रं.९ येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या विकास कामासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत ४८ लक्ष ९६ हजार ८१५ रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. यावेळी सदर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला.राज्य शासन नागरिकांच्या हिताचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयक धोरणात्मक निर्णय घेत असून, राज्याच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध महत्वकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेत असल्यामुळे अनेक योजने अंतर्गत वरुड मोर्शी तालुक्यामध्ये विकासकामे करण्यात येत आहे.

वरुड मोर्शी तालुक्याची यशस्वीरित्या विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.यावेळी भूमिपूजन सोहळ्याला आमदार देवेंद्र भुयार, वरुड शहराच्या नगरध्यक्षा सौ.स्वातीताई आंडे, नगरसेवक महेंद्र देशमुख, जितु शाह, प्रभाकर काळे, जगदीश बेलसरे, निखिल बनसोड, माधवराव देशपांडे, स्वप्नील आजनकर, जगबिर सिंग भावे, राजु सिरस्कार, रितेश श्रीराव, उमेश शिराळकर, तुषार देशमुख, विलास उघडे, समीर अली, गणेशराव धोटे, भोजराज देवते, गोपाळराव वानखडे, प्रमोद पाठक, अशोक देवते, अशोक वानखडे, दिलीप लव्हाळे, आकाश बेलसरे, प्रभाकर जोशी, गजानन लव्हाळे, सुधिर देवते, माधवराव देशपांडे, दिनकरराव पोहुकर, नीलकंठ आंडे, दिलीप पांडे यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.