राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचा “आकार” वार्षिकांक गोंडवाना विद्यापीठाद्वारे द्वितीय क्रमांकाने पुरस्कृत

32

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11ऑक्टोबर):-गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठाशी सलग्नित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाच्या “आकार” वार्षिकांक २०२१ ला विद्यापीठ स्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

सदर पुरस्कार विद्यापीठाच्या दशमानोत्सव समारंभात दहाव्या वर्धापनदिनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, प्रभारी कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, आमदार कृष्णा गजभे, माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, डॉ. नामदेव कल्याणकर, डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांचे उपस्थितीत महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील, वार्षिकांकाचे संपादक डॉ. प्रफुल्ल बन्सोड, सहसंपादक प्रा. आशुतोष पोपटे यांनी स्वीकारला.

विद्यार्थांच्या अंगी असलेल्या सुप्त सृजनशिलतेचा अविष्कृत करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी “आकार” वार्षिकांकाचे संपादन केले जाते. यापूर्वीही वार्षिकाकास नागपुर विद्यापीठाद्वारे दोनदा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर “आकार” वार्षिकांक संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायक कापसे व संस्थेचे इतर पदाधिकारी यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील यांचे मार्गदर्शनातून वार्षिकांकाचे संपादक डॉ. प्रफुल्ल बन्सोड, सहसंपादक प्रा. आशुतोष पोपटे, प्रा. रोशन कुमरे आणि संपादक मंडळातील सदस्यांच्या प्रयत्नातून साकार करण्यात आला.

या वार्षिकांकाच्या निर्मितीमध्ये वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. हरेश गजभिये, प्रा. पितांबर पिसे, प्रा. प्रफुल राजुरवाडे, डॉ. नितीन कत्रोजवार, डॉ. राजेश्वर रहांगडले, डॉ. उदय मेंडूलकर, डॉ. लक्ष्मन कामडी, प्रा. राकेश कुमरे, प्रा. गुणवंत वाघमारे आदीसह इतर प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.