फाळके स्मारकाच्या खाजगीकरणाला कलावंतांचा कडाडून विरोध अन्यथा तिव्र आंदोलन करणार.

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11ऑक्टोबर):-नाशिक शहराचे वैभव असलेल्या *चित्रपट महर्षी पद्मश्री दादासाहेब फाळके स्मारक* म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. गेल्या काही वर्षांपासून हेच फाळके स्मारक महानगरपालिकेच्या दुर्लक्षित पणामुळे बंद अवस्थेत आहे. आणि आता त्या फाळके स्मारकाची अवस्था खूप कठीण झालेली असल्याने महानगरपालिका फाळके स्मारकाची सुधारणा करुन बंद पडलेली रोषणाई चालू करून नाशिककरांच्या सेवेत देण्याऐवजी त्याचे खाजगीकरण करीत आहे असे निदर्शनास आले आहे. म्हणुनच महाराष्ट्रातील कलावंतांची पोलादी संघटना असलेल्या महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती ने नाशिक महानगरपालिकेच्या ह्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची तयारी सुरु केली आहे.

यानिमित्ताने नाशिक शहरातील चित्रपट क्षेत्रातील कलावंतांची महत्वाची बैठक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी चित्रपट निर्माते/दिग्दर्शक प्रमोद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या राज्यातील महिला जेष्ट नेत्या मेधाताई पाटकर ह्या काही कामानिमित्त नाशिक मधे आल्या असता त्यांनी देखील फाळके स्मारक बचाव आंदोलनाला आपला जाहिर पाठिंबा व्यक्त केला व अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या वतीने दिगदर्शक दिनकरराव पांडे यांनी देखील पाठिंबा दिला असल्याने भविष्यात फाळके स्मारक बचाव आंदोलन उग्र रूप धारण करेल यात शंका नाही.

स्थानिक कलावंतांना आपल्या उपजत कला प्रदर्शित करण्यासाठी व चित्रपटात संधी मिळावी यासाठी मुंबई- कोल्हापूर – पुण्यातील अशा बडया निर्माते-दिगदर्शक यांच्या कडे हजारो चकरा माराव्या लागतात पण तरीसुध्दा त्यांना मोठ्या चित्रपटात हवी तशी मिळत नाही. तेच फाळके स्मारक ह्याच द्रुष्टीने स्थानिक कलावंतांच्या कलेला न्याय मिळावा नाशिक सह विविध जिल्ह्यातील छोट्या मोठ्या कलावंतांना चित्रपट निर्माते यांना ह्या फाळके स्मारकाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करता येतील त्यांच्या कलेला उजाळा मिळेल यासाठी ह्या फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. पण आता तेच महानगरपालिका खाजगी तत्वावर मुंबईच्या बडया मोठ्या भांडवलदारांच्या हातात देऊन नाशिक जिल्ह्यातील चित्रपटक्षेत्रातील कलावंतांवरती व निर्माता /दिग्दर्शक यांच्या वरती अन्याय करीत आहे.

आणि म्हणून सदर बैठकीत हे फाळके स्मारक महानगरपालिकेने खाजगीकरण करीत दुसऱ्या कुणाच्या हाती देऊ नये तसे काही खाजगीकरण करण्यासाठी निश्चित केले असेल तर नाशिकच्या स्थानिक कलावंतांच्या संस्था /संघटनेच्या कडे सुपुर्द करावे “स्थानिक कलावंतांच्या संस्था/संघटना सक्षम आहेत” मात्र नाशिकच्या बाहेरील कोणत्याही व्यक्ती अथवा नामांकित कंपनीला हस्तांतरित करु नये असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हा संपर्कप्रमुख नाटय कलावंत राजेश शिंदे यांनी तर आभार अभिनेत्री अनिता पाटील यांनी मानले.या महत्त्वाच्या बैठकीला प्रामुख्याने अभिनेत्री सुनंदा विसपुते, महिला कलावंत सौ. मंगलताई मोकळ, सह महिला कलावंत जयाताई पाल, निर्माते चंद्रकिरण सोनवणे,पत्रकार शांताराम दुनबळे, अभिनेता रमेश जाधव, निर्माते हिरामण मनोहर, सरपंच दत्तात्रय तांबे, अभिनेता संजय गांगुर्डे, अभिनेत्री राजश्री कौठकर, कविवर्य भाऊ केदारे, अॅड. शहाजी वानखेडे, मास्टर राजेंद्र जाधव, अहिराणी शाहिर अशोक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शा.चत्रुराज आव्हाड आदीसह शेकडो कलावंत आवर्जून उपस्थित होते.

महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED