सर्व समाजवेशक आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व हरवले – प्रकाश पाटील देवसरकर

🔸ज्येष्ठ रिपब्लिकन नेते बापुरावजी धुळे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली 

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.11ऑक्टोबर):-दि. 10 ऑक्टोबर आंबेडकर विचारसरणी जीवनात अंगीकारत ती चळवळ सर्व समाजापर्यंत पोहोचविणारा सर्व समाज वेशक आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व आदरनिय बापुरावजी धुळे यांच्या जाण्याने हरवले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले .

ते सुमेध बोधी विहारच्या वतीने बापुरावजी धुळे यांची श्रद्धांजली सभा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दि. 9 ऑक्टोबर 2021रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केली होती.त्यावेळी सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटना श्रद्धांजली सभेत बोलत होते.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे होते तर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा ,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातूजी देशमुख ,पं. स. सभापती प्रज्ञानंद खडसे , नगरसेवक संदीप ठाकरे , गजेंद्र ठाकरे, माजी जि. प. अध्यक्ष रमेशराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल, पुसद अर्बन चे संचालक गोपाल अग्रवाल, अरविंद ओझलवार, दत्तात्रय काळे, प्रा प्रदिप इंगोले, सुधाकर लोमटे, वीरेंद्र खंदारे, सुधाकर कांबळे, सिद्धार्थ बरडे, सिद्धार्थ दिवेकर (उमरखेड शहराध्यक्ष भीम टायगर सेना), प्रफुल दिवेकर, शुद्धोधन दिवेकर, डॉ. सुनील चिंचोळकर, एम डी कोकणे, प्रा.डॉ धनराज तायडे , उद्धव गायकवाड, यशवंत काळबांडे ,दीपक सिंगणकर, सुमेध बोधी विहाराचे अध्यक्ष प्रो. डॉ. अनिल काळबांडे, सचिव भीमराव सोनुले यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी या श्रद्धांजली सभेत बापुरावजी धुळे यांच्या जीवनाला व त्यांच्यातील सामाजिक कार्याला उजाळा देऊन त्यांनी केलेले कार्य जीवनात अंगीकार करने हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले.सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटना श्रद्धांजली सभेचे आयोजन सुमेध बोधी विहारा तर्फे आयोजित करण्यात आले होते.सभेचे सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन दामोदर यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED