महाराष्ट्र बंदची हाक…. चिमूर वासियांचा प्रचंड प्रतिसाद

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11ऑक्टोबर):-उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा सम्पूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.देशातील शेतकऱ्यावर भाजपाच्या केंद्र सरकार कडून साततत्याने अन्याय अत्याचार होत आहे . लखीमपुर खीरी येथील या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी चिमूर तालुका महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मा श्री धनराजभाऊ मुंगले, जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, माजी जीप सदस्य विलास डांगे यांचे नेतृत्वात चिमूर शहरात व्यापारी मंडळीना दुकाने बंद करून आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते धनराजभाऊ मुंगलेे, शिवसेना उपजिलाप्रमुख प्रमुख अमृत नखाते, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे,कांग्रेस तालुका सचिव विजय डाबरे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष राजू मुरकुटे ,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अनिल रामटेक, बाळकृष्ण बोभाटे, राजू दांडेकर, रिताताई अंबादे, संदिप कावरे, धनराज मालके, राजेश चौधरी, सुधाकर निवटे, अनिल डगवार, देवीदास गिरडे, रोशन जुमड़े, अन्ना गिरी, उमेश हिंगे, आशीष बगुलकर, राकेश साठोने, सूर्यभानजी ननावरे, तुळशीराम बनसोड, सुरेश गजभे, हरिदास सोरदे, प्रशांत डवले, संदीप कावरे, निखिल डोंइजड , प्रणय शिंदे,कमलाकर बोरकर,मनीष वझरे, रामदास चौधरी, नाजेमा पठान, शहनाज अंसारी, माधुरी केमये,व सर्व महाविकास आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED