नवीन मतदारांनी मतदान यादीत नाव समाविष्ट करावे -बि.वाय. पोफाळकर

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

धनज(दि.11ऑक्टोबर):-लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांनी (पुरूष +महिला+ इतर ) मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत दुबार अथवा स्थलांतराची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार उमरखेड तालुका निवडणूक अधिकारी यांनी जनजागृती मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.

भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 31ऑक्टोबर 2021 या कालावधीत उमरखेड 082 विधानसभा Online विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2022
कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदार जागृती करण्यात येत आहे .भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघाची मतदार यादी महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत एक जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत. त्याचबरोबर मृत दुबार समान नोंदी देखील बदलता येतील आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावात दुरुस्ती करता येतील. मतदार यादी अद्ययावत आणि अधिकाधिक बिनचूक करण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नावांमध्ये दुरुस्ती असल्यास त्याही कराव्यात.

मृत्ताचे अथवा दुबार नावे वगळायचे असल्यास (नमुना क्रमांक 6 नमुना 7 नमुना 8) तो मतदार नोंदणी अधिकारी अथवा ऑनलाइन पद्धतीने www.nvsp.in या संकेत स्थळावर भरावा .या संकेत स्थळावर नवीन मतदार म्हणून देखील नाव नोंदवता येईल अशी माहिती केंद्रस्तर मतदार( BLO) अधिकारी बी.वाय.पोफाळकर सर मतदान केंद्र क्रमांक १५५ व १५६ डी.एन. कांबळे सर यांनी धनज यथे दीली.
नवीन मतदार नोदंणीसाठी लागणारे कागदपत्रे
घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३)आधार कार्ड झेरॉक्स
४) २ पासपोर्ट साईज फोटो
५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स
घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३)२ पासपोर्ट साईज फोटो
४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७)लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला. वरील कागदपत्रे आणून द्यावे असे सांगितले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED