ऑनलाईन मुक्ती महोत्सवाचे आयोजन

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

🔹व्याख्यान,परिसंवाद,चर्चासत्राचे आयोजन

येवला(दि.११ऑक्टोबर):-येथील कोर्ट मैदानात मुंबई इलखा दलित वर्ग परिषदेत १३ ऑक्टोबर १९३५ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८६ वा वर्धापन दिन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दिनांक १३ ते १७ ऑक्टोबर २०२१ रोज सायंकाळी ६ ते ७:३० वा.ऑनलाईन होणार असून देश विदेशातील सुप्रसिद्ध नावंत विचारवंत,साहित्यिक,कलावंत,सनदी अधिकारी ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२१ – मुक्तीभूमी येवला ह्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मुक्ती महोत्सव समितीचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळसर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

कार्यक्रम रूपरेषा :
ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२१ उदघाटन दिनांक १३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वा.उदघाटक व व्याख्याते सुप्रसिद्ध वैद्य डॉ.संग्राम पाटील (लंडन) व्याख्यान विषय धर्माचे विज्ञान व विज्ञानाचा धर्म सत्राचे अध्यक्ष जिल्हा रुग्णालय औषध निर्माण अधिकारी डॉ.प्रमोद बिऱ्हाडे,दिनांक १४ ऑक्टोबर सायंकाळी ६ वा.परिसंवाद विषय महाकवी वामनदादा कर्डक यांचे शाहिरी,साहित्यातील संविधानिक मूल्यविचार वक्ते प्रा.डॉ.उत्तम अंभोरे,डॉ. किशोर वाघ (भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद),अध्यक्ष कवी विनायक पाठारे,दिनांक १५ ऑक्टोबर सायंकाळी ६ वा.डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि आजची प्रसार मध्ये.वक्ते डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी (जेष्ठ साहित्यिक,विचारवंत नागपूर),अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे, दिनांक १६ ऑक्टोबर सायंकाळी ४ वा.व्याख्यान विषय भारतीय संविधान शिक्षण-प्रशिक्षण व संवर्धन काळाची गरज वक्ते माजी आयपीएस अधिकारी इ.झेड.खोब्रागडे, अध्यक्ष मनीषाताई पोटे (युवामित्र, सिन्नर),दिनांक १७ ऑक्टोबर सायंकाळी ६ वा. समारोप हस्ते व व्याख्याते महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव शाम तागडे विषय धम्म चळवळीची दिशा व धम्म प्रचारक व्यक्ती,संस्था,संघटनांची जबाबदारी अध्यक्ष प्रकाश वाघ हे असतील.

युट्यूब लाईव्ह होणाऱ्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ,शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड,ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे मुक्ती महोत्सवास सदिच्छा संदेश व्हिडीओ फिती द्वारे देणार आहेत.शरद दिनकर शेजवळ यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुक्ती महोत्सवाचे हे ११ वर्ष असून या ऑनलाईन महोत्सवास तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सूर्यवंशी (उस्मानाबाद) करणार असून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश खळे,भारतीय बौद्ध महासभेचे येवला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव सुभाष गांगुर्डे,महेंद्र गायकवाड,महेंद्र पगारे,संजय पगारे,प्रा.जितेश पगारे,मिलिंद गुंजाळ,शैलेंद्र वाघ, चंद्रकांत निकम,सुभाष वाघेरे,वनिता सरोदे,राजरत्न वाहुळ,अमीन शेख,,नितीन संसारे, हिरामण मेश्राम,सुरेशदादा सोनवणे,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला आदी संस्था संघटना प्रयत्नशील आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED