केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंदला राजुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

🔸केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.12ऑक्टोबर):-लखीमपूर येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गाड्या चढवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राजुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महाविकास आघाडीच्या शिवसेनेने रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंद ला पाठिंबा दर्शवला.शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरुकुडे यांच्या नेतृत्वात शहरात भव्य रॅली काढून व्यापाऱ्यांची दुकानें बंद करण्यात आली. राजुऱ्याच्या इतिहासात प्रथमतः बंदला इतका मोठा प्रतिसाद मिळताना दिसला.

याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश गंपावर, तालुका समन्वयक वासुदेव चापले, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, माजी शहर प्रमुख भुमन सल्लम,माजी संघटक नरसिंग मादर, रमेश पेटकर सरपंच सास्ती,युवासेना पदाधिकारी कुणाल कुडे, स्वप्नील मोहुर्ले,आणि तालुक्यातील प्रत्येक गावचे शिवसेना शाखाप्रमुख, युवासेना शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED