माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी घेतली राज्यपाल भगतसिहजी कोश्यारी यांची भेट

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.12ऑक्टोबर):– महामहीम मा.भगतसिहजी कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य, यांची माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव डॉ नामदेवराव उसेंडी यांनी गडचिरोली येथील विश्रामगृहात भेट घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील समस्या बाबत चर्चा केली.

यावेळी समस्यावर सकारात्मक चर्चा झाली.यावेळी गडचिरोली जिल्हा महाग्रामसभेचे पदाधिकारी जि.प.सदस्य सैनुजी गोटा, जि.प.सदस्य अँड. लालसु नागोटी, शिवाजी नरोटे, नितीन पदा, संजय गावडे उपस्थित होते.