महाराष्ट्र सरकार द्वारा आयोजित मिशन कवचकुंडल खामगाव येथे ऊत्तुंग प्रतिसाद

84

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.12ऑक्टोबर):-मिशन कवच कुंडल या अभियानाअंतर्गत covid-19 च्या दृष्टिकोनातून मोफत लसीकरणच्या Covidshild पहिल्या व दुसऱ्या शिबिराचे आयोजन 10 व 11 ऑक्टोंबर 2021ला आईसाहेब मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे त्या अनुषंगाने आज शिबिराचे उद्घाटन संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या शिबिरामध्ये दोन दिवसात प्रभाग क्रमांक 9 मधील व परिसरातील जवळपास 600 नागरिकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घेतला.

यावेळी शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र दादा देशमुख, नगरसेविका सौ संगीता ताई पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघ महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता ताई तनपुरे, शोभाताई बाळापुरे,वसंतराव पाटील,कृष्णा पाटील,अविनाश वानखेडे,मोईनुद्दीन सरदार,मो.आरिफ,रंजित देशमुख,दिलीप पाटील,आकाश खरपाडे,प्रशांत धोटे,अजय धनोकार, उपस्थित होते.