केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणा विरोधात महाविकास आघाडी व डाव्या पक्षांची वज्रमुठ

28

🔸लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवत परळीकरांचा ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वै.(ता.१२ऑक्टोबर):- शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करावे या प्रमुख मागणीसह लखीमपुर खिरी येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी (ता.११) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला परळी तालुक्यात शंभर टक्के प्रतीसाद मिळाला आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने जवळपास एक तास संयुक्त निदर्शने करण्यात आली.
   
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन कृषी कायदे रद्द करा व किफायतशीर आधारभावाची हमी देणारा कायदा करा या प्रमुख मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर दहा महिन्यांपासुन  शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणुन उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. उत्तरप्रदेश मधील लखीमपुर खिरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर ३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने वाहन घातले. आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालुन चौघा जनांना चिरडले आहे. त्यात चार आंदोलक शेतकऱ्यांसह आठ जनांचा मृत्यु झाला आहे.काही आंदोलक शेतकरी गंभार जखमी झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या इतीहासातील ही अत्यंत निंदनीणीय व निषेधार्ह घटना आहे.

लखीमपुर घटनेतील आरोपींवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून कडक शासन करावे, केंद्र सरकारने लागु केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे व केंद्रीय गृहराज्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा या मागणीसाठी महाविकास आघाडी व इतर पक्ष व संघटनेच्या वतीने सोमवार (ता11) रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये परळी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेउन सहभाग नोंदविला. महाविकास आघाडी व डाव्या पक्षाच्या वतीने परळी शहरातुन दुचाकी वाहनावरून फेरी काढुन व्यापाऱ्यांना व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे केंद्र सरकारच्या विरोधात निगर्शने करण्यात आली. यावेळी लखीमपुर खेरी येथील मृत शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. परळी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.

यावेळी लखीमपुर घटनेतील आरोपींवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून कडक शासन करावे, केंद्र सरकारने लागु केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे व केंद्रीय गृहराज्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

या आंदोलनात मा.क. प.नेते कॉ.पी.एस. घाडगे सर,पंचायत समिति सभापती बालाजी मुंडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधकारी,जिल्हा उपाध्यक्ष चंदूलाल बियाणी,शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,शहरप्रमुख राजेश विभूते,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख,आय काँग्रेस शहर अध्यक्ष सय्यद हनीफ(बहादुर भाई) ,माजी शहराध्यक्ष प्रकाश देशमुख,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, मोहनराव सोळंके,जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथ सोळंके,शिवसेना विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा.अतुल दुबे,सुरेशअण्णा टाक, बी. जी.खाड़े, प्रभाकर नागरगोजे,माणिक भाऊ फड़,नगरसेवक अय्यूब पठाण, राजखान पठान, संजय फड, गोविंद मुंडे, बालाजी चाटे, शंकर आडेपवार, विजय भोयटे, अनिल आष्टेकर, नितीन रोडे, गोपाळ आंधळे,जयपाल लाहोटी,रा. कॉ.तालुका अध्यक्ष गोविंद कराड, बाशिद भाई,युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज,बाबासाहेब बळवंत ,चेतन सौंदळे,राजाभैय्या पांडे, अनवर मिस्कीन,शंकर आडेपवार, गोविंद कुकर,वैजनाथ बागवाले,के.डी. उपाडे रविंद्र परदेशी,राजकुमार डाके,भारत ताटे,महेबुब कुरेशी,सचिन आरसुळे,योगेश नानवाटे,लक्ष्मण देवकर, शेख मुख्तार,बालाजी गित्ते,भागवत गित्ते,नारायण सातपुते, सतीश जगताप,सुदर्शन यादव,मोहन राजमाने, दिपक शिंदे संतोष चौधरी, मोहन परदेशी, तुकाराम नरवडे,वैजनाथ माने,युवराज सोलंके,विजयप्रसाद अवस्ती, कॉ. युवक अध्यक्ष गुड्डू खोसे पाटिल,शशी चौधरी, अलिमभाई, सिकंदर भाई,अशोक कांबळे,फुरकंद बेग, रसूल खान,अजय राठोड,सुभाष देशमुख, बदर भाई,राहुल देशमुख,अल्ताफ भाई, गणपत कोरे,गुलाबराव देवकर, मुळे मामा,आड़. मनजीत सुगरे, के.डी. उपाडे,नाझिर हुसेन, संजय देवकर,रमेश चौण्डे,शंकर कापसे, महेंद्र रोडे,रमेश भोयटे, दत्ताभाऊ सावंत, रवी मुळे,राहुल ताटे, जालिन्दर नाईकवाडे, मुन्ना बागवाले, केशव गायकवाड,जमील अध्यक्ष,अजिज कच्छी, लालाखान पठाण, जावेद कुरेशी, ज्ञानेश्वर होळबे,जयप्रकाश लड्डा, दिनेश गजमल,प्रा.श्याम दासुद सर,मुन्ना बागवाले, बळीराम नागरगोजे,जमील अध्यक्ष,सुरेश गित्ते, धम्मा अवचारे,आड़. सुरेश सिरसाठ,राहुल जगतकर सर,रज्जाक कच्ची,प्रताप समिंदरसवळे,प्रणव परळीकर,सुरेश नानवटे, राज जगतकर,भागवत गित्ते,तकी खान,जयदत नरवटे,अमर रोडे ,अमित केंद्रे,पवन फुटके,संकेत दहीवाडे,राजाभाऊ स्वामी,नारायण मुंडे,शकील कच्ची,शेख इलियास,शेख हसन,अल्ताफ पठान, देवराव कदम,संजय देवकर,मोईन काकर, राजुभाई,गिरीष भोसले, सचिन मराठे,एस. के. गित्ते,श्रीहरि कवडेकर, पांडुरंग राठोड,आड़. परमेश्वर गित्ते,रमेश मस्के,किरण सावजी, प्रकाश चव्हाण,रमेश साखरे,जलिंदर गिरी,सुभाष वाघमारे, विष्णु साखरे,राज हजारे, अमजद अली, शेख खदिर, गणेश सुरवसे,उमेश सुरवसे, कांचन मुजमुले, आमोल वंजे,शेख अशफाक, इ. उपस्थित होते.