आष्टी वार्ताहरच्या दिवाळी अंकाचे अभिनेत्री शिवानी बावकर आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते झाले मुंबईत प्रकाशन

27

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.12ऑक्टोबर):-गेली २८ वर्षे आष्टी वार्ताहर दिवाळी अंकाने ग्रामीण भागात जन्माला येऊनही दर्जेदार,कसदार साहित्य,कविता,कथांना अंकात स्थान दिले.लोकांची वाचन भूक भागवली.हे निश्चितच गौरवास्पद आहे असे अभिनेत्री शिवानी बावकर हिने गौरवोद्गार काढले.तर माझ्या बीड जिल्ह्यातून सातत्य राखून ग्रामीण शेतकरी,शेतमजूर,कष्टाळू कामगार,ऊसतोड कामगारांच्या व्यथा-वेदना सातत्याने दिवाळी अंकाच्या माध्यमातून,कथा,कविता,लेख यामधून आष्टी वार्ताहरने मांडल्या.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब,भगिनी पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते वार्ताहर दिवाळी अंकाचे यापूर्वी प्रकाशन झालेले आहे.आज माझ्या हस्ते प्रकाशन होत असताना एक हॅटट्रिक साधली जात आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे असेही खा.डॉ.प्रीतमताई मुंडे म्हणाल्या.

यावर्षीच्या आष्टी वार्ताहार दिवाळी अंकामध्ये शिल्पा केळकर,भीष्मराज बाम,गुरुवर्य अनंत हंबर्डे,प्रसिद्ध ग्रामीण कथाकार डॉ.भास्कर बडे,कवी,कथाकार विठ्ठल जाधव,भगवान राउत,प्रा.बिभीषण चाटे,अमृता नरसाळे,कमलेश पैठणकर,डॉ.जगन्नाथ कांबळे,मंजुषा कुलकर्णी, प्रा.पंजाबराव येडे,बबन महामुनी,रजनी ताजवे,डॉ.राधाकृष्ण जोशी,निवृत्ती बनसोडे,ह.भ.प.दिनकर तांदळे,हरीभाऊ उपाध्ये,दत्ताभाऊ बोडखे,प्रवीण पोकळे,इंजि.राकेश बोडखे,माधुरी पवार,अविनाश डावुन,कु.समृद्धी,अनिता केरू पवार, दिपाली सुभाष डोके,आकाश डोंगरे यांची लागीर झालं जी फेम अभिनेत्री शिवानी बावकर यांच्यावरील कव्हरस्टोरी आहे.

आष्टी वार्ताहर दिवाळी अंकाचे मार्गदर्शक कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी लिहिलेला दैनिक झुंजारनेताचे दिवंगत निवासी संपादक श्रीपती माने यांच्यावरील ह्दयस्पर्शी लेख आणि  व्यंगचित्रकार भरत घटे यांच्या व्यंगचित्रासह राजकीय उपाहासिकांची आतषबाजी हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.या प्रकाशन सोहळ्याला संपादक उत्तम बोडखे,कार्यकारी संपादक दत्ता बोडखे,हनुमंत कावळे,संतोष मोठे,आकाश डोंगरे,भिमाजी दळवी उपस्थित होते.गेल्यावर्षी सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा शुभहस्ते त्या आधीच्यावर्षी चित्रपट अभिनेता अमोल कोल्हे यांच्या हस्ते आष्टी वार्ताहर दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले होते.