कमळवेल्ली येथील सोयाबीन गेली चोरीला…

🔺बळीराजाच्या मानगुटीवर मानवी संकट

✒️प्रतिनिधी झरीजामणी(सुनील शिरपुरे)

झरीजमनी(दि.12ऑक्टोबर)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती हा आर्थिक चक्रव्युहात सापडलेला आहे. याही परिस्थितीत बळीराजा हा कसा-बसा इकडून-तिकडून पैसे जमवून आपली शेती फुलवलेला आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीनुसार पिकेही चांगली तररू लागली. परंतु या पिकांना निसर्गाचीही नजर लागली. आपण मानवाची नजर काढू शकतो. पण निसर्गाची नजर कााढणे हे मानवाच्या अवाक्याच्या बाहेरचं आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीतून कुणीही सुटत नाही. अशाप्रकारे बळीराजावर आस्माणी संकट कोसळलं. या संकटात ब-याच पिकांची नासधुस झाली आणि बळीराजाच्या स्वप्नावर पाणी फेरल्या गेलं. उर्वरीत काही पिकांची काढणी करून घरी आणल्या गेलं.

परंतु घरी आणलेल्या या पिकांनी ओलावा धरून ठेवल्यामुळे आधी त्याला वाळायला टाकावं लागतं. सध्या जिकडे-तिकडे सोयाबीनची काढणी सुरू आहे. अशातच कमळवेल्ली येथील भाऊराव मारोती ठाकरे या बळीराजाची 7 ऑक्टोबरला सोयाबीनची काढणी झाली. त्यानंतर ते सोयाबीन घरी आणून वाळायला टाकली. तिन-चार दिवस झाले ते सोयाबीन वाळायला टाकत आहे. आता, आपणास तर माहितच आहे की, रात्रीला ते जमा करून झाकठोक करून ठेवावी लागते. तसच त्यांनी पण केलं होतं. परंतु काल मध्यरात्रीला तिन-चार पोती सोयाबीन चोरीला गेली. रात्रीच्या सुमारास जेव्हा त्यांना जाग आली, तेव्हा त्यांना आपले सोयाबीन चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं. परंतु अद्यापपर्यंत त्या अज्ञात व्यक्तीचा पत्ता लागलेला नाही.

आधीच अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आपला बळीराजा आता मानवाच्या संकटानेही त्रस्त होत असल्याचं दिसून येत आहे. अशा रितीने बळीराजाच्या मानगुटीवर एक ना एक संकट बसत आहे. परंतु जगाचा पोशिंदा असणा-या बळीराजाचा या ‘जय किसान’च्या देशात कुठेच विचार होतांना दिसून येत नाही. ही आपल्या देशातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. निदान आता तरी या संकटांचा विचार करून कोणत्या तरी माध्येमातून आर्थिक सहाय्य मिळतील का? याकडे सर्व बळीराजा मोठ्या आशेने बघत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED