केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंदला जिवती- पाटण येथे शिवसेना- काॅंग्रेस-राष्ट्रवादी रस्त्यावर

27

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.12ऑक्टोबर):- नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र बंद दरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात अली होती. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली. यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घा घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडू महाराष्ट्र बंद करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काॅंग्रेह या तिन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र बंद दरम्यान सहकार्य करुन तालुक्यातील ठिकाणी व्यापारी, प्रतिष्ठिने बंद करून सहकार्य केले.

महाराष्ट्र बंदला जिवती शहर आणि पाटण, येथील व्यापाऱ्यांनी पाठींबा देऊन सहकार्य दिला आहे. जिवती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलासभाऊ राठोड, अशपाक शेख जिल्हा महासचिव, युवक काँग्रेस, तालुका अध्यक्ष कोटनाके युवक काँग्रेस, बळीराम शेळके शिवसेना तालुका समन्वयक, अमर राठोड राष्ट्रवादी युवानेते, रमेश गायकवाड, विष्णू रेड्डी, आशिष डसाने, दत्त राठोड, शामराव गेडाम, मुकेश चव्हाण, रमेश जाधव, समीर पटाण, सुनील शेळके, विलास वाघमारे, रांका, काँग्रेस, शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते.पाटण क्षेत्रात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सर्व मार्केट बंद करुन 2.30 वाजेपर्यंत बंद व रस्ता रोको करण्यात आले.

यावेळी भिमराव पाटील मडावी,माजी जि प.सदस्य, चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली पार पाडली,यावेळी,शेख कलीम शेख इब्राहिम माजी सरपंच आंबेझरी, सिताराम मडावी जिल्हा महासचिव जिल्हा युवक काँग्रेस चंद्रपूर , सलीम शेख अल्पसंख्याक तालुका महासचिव, अल्पसंख्याक सेलचे माजी अध्यक्ष शेख आरिफ भाई ,भिमराव पवार,माजी उपसरपंच पाटण , राष्ट्रवादी किसान काँग्रेस चे तालुका अध्यक्ष हवगीराव शेटकर,वाघुजी उईके, प्रभाकर उईके,पंठु पाटील पवार, सय्यद रसुल भाई,जयदेव आत्राम,दिनकर मडावी,बादु पा तोडासे,इसरु मेश्राम,शेख फरीद मामू, यांच्या उपस्थितीत पाटण बंद करुन, अमानुष घटनेच्या निषेध व्यक्त करुन,महाविकास आघाडीचा निर्णायाला जाहीर पाठिंबा दरर्शविण्यात आला, सुत्रसंचलन आरीफ शेख यांनी केले व प्रास्ताविक भिमराव पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव सिताराम मडावी यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,व शिवसेचे पदाधिकारी उपस्थित होते