रणमोचन येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12ऑक्टोबर):-ब्रह्मलीन वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांची 53 वि पुण्यतिथी महोत्सव रणमोचन (नविन आबादी) येथे दरवर्षी प्रमाणे दि.१० ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर 2021 रोजी साजरा करण्यात आली. ब्रम्हलीन वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्य श्रमदान व ग्रामसफाई, सामुदायिक प्रार्थना, भजनाचा कार्यक्रम,हळदी कुंकू व रांगोळी स्पर्धाचे कार्यक्रम व कीर्तनकार ह.भ.प.शंकरजी कावळे महाराज उमरेड यांच्या मुखकमला द्रारे भजन व प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला. विशेष कार्यक्रम ब्रम्हलीन वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली सायंकाळी ४:५८ वाजता वाहिली .

कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली विष्णुजी तोंडरे मुख्याध्यापक बेटाळा ,प्रमुख अतिथी ह.भ.प. शंकरजी कावळे महाराज उमरेड,काँग्रेसचे जेष्ठ नेते नानाजी तुपठ, राजेंद्र गुणशेटीवार चौगान, मोरेश्वर ननावरे,पत्रकार गोवर्धन दोनाडकर ब्रम्हपुरी, सुल्ताने पोलीस पाटील ,चौरू दोनाडकर ,ग्रा. प. सदस्य अश्विनी दोनाडकर ,ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान, घनश्याम मेश्राम ,अंगणवाडी सेविका लक्ष्मीताई दोनाडकर ,सोनू मैंद चौगान व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोवर्धन दोनाडकर यांनी केले तर संचालन नितेश दोनाडकर तर आभार मिथुन मेश्राम यांनी केला. कार्यक्रम यस्वितेसाठी गुरुदेव सेवा मंडळ ,हनुमान देवस्थानचे पदाधिकारी ,चैतन्य महिला शारदा मंडळ , बालगोपाल व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.