भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास गडचिरोली जिल्हा शाखेने निवेदनातून दिला इशारा

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.१२ऑक्टोबर):- वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रामधील चुरचुरा बिटात मागील महिनाभरापुर्वी वनविभागाच्या राखीव जंगलात अंदाजे 40 एकर जागेत वनकर्मचारी अधिका-यांना हाताशी धरून काही गुन्हेगारांनी अवैध वृक्षतोड करून वनसंपत्ती फारमोठया प्रमाणात नष्ट केली यात हजारो झाडांची कत्तल झाली आहे व करोडो रूपयांची संपत्ती नष्ट झाली असतांना वनविभागाकडे चुरचुरा गावातील ग्रामवासीय व अनेक सामाजिक संगठनांनी सदर प्रकरणी सखल चौकशी करावी याकरिता अनेक तकार निवेदन सादर केले. परंतु आपण गावकरी बांधवांना व जनतेला मुर्ख समजत असल्याचे दिसुन येत आहे.

ज्यामुळे प्रचंड भ्रष्ट्राचार करून वरिष्ठ अधिकारी संबंधीत दोषी वन कर्मचा-यांना व वन गुन्हेगारांना वाचविण्याचे काम करित आहात असे नाकारता येत नाही. यापुढे थातुर मातुर चौकशी चालणार नाही तेव्हा नव्याने उच्चस्तरीय चौकशी गठीत करून चुरचुरा येथील एकुण अवैध वृक्षतोडीची येत्या दहा दिवसात सखोल चौकशी करावी व संबंधित दोषी वनरक्षक, वनपाल व वन परिक्षेत्र अधिकारी यांचेवर तातडीने निलंबनाची कार्यवाही करून झालेल्या अवैध वृक्षतोडीची नियमानुसार सरासरी किंमत काढुन दोषी आढळणा-या वनकर्मचारी व वनाधिकारी यांचेकडुन सदर नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी. व येत्या दहा दिवसात चौकशी न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने भ्रष्ट्राचार जनआंदोलनाच्या वतीने तिव्र आंदोलन केल्या जाईल व ही वेळ येवु नये याकरीता तातडीने सखोल चौकशी करण्यात यावे. या मागणीचे निवेदन वनसंरक्षक यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास गडचिरोली जिल्हा शाखेने दिले.

निवेदन देतांना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे,जिल्हा संपर्क प्रमुख योगाजी कुडवे, रमेशजी बांगरे, नानाजी ठाकरे, धनपाल कार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.