झाडीबोलीचे २८ वे साहित्य संमेलन मुरझा (पारडी ) येथे होणार

✒️पारडी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पारडी(दि.12ऑक्टोबर):-झाडीबोली साहित्य मंडळाचे २८ वे झाडीबोली साहित्य संमेलन येत्या २५ व २६ डिसेंबर २०२१ रोजी मुरझा (पारडी ) ता. लाखांदूर जि. भंडारा येथे नियोजित असल्याची घोषणा संस्थापक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांनी केली. कोरोना संकटामुळे मागील दोन संमेलने होऊ शकली नाहीत. म्हणून शासनाच्या निर्देशाप्रमाणे सदर संमेलन घेण्याबाबत मंडळातर्फे चर्चा करण्यात आली. लाखनी येथील सभेत झाडीबोलीचे कवी कुंजीराम गोंधळे यांनी स्वेच्छेने निमंत्रण दिले.

त्यानुसार चर्चेअंती निर्णय करण्यात आला. सभेत ज्येष्ठ साहित्यिक माजी आ. हेमकृष्ण कापगते ,हिरामण लांजे, डाॕ. राजन जयस्वाल ,डाॕ. दिगंबर कापसे , सौ. अंजनाबाई खूणे ,ॲड.लखनसिंह कटरे,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,मिलिंद रंगारी मंडळाच्या ह्या ज्येष्ठ पदाधिका-यांनी सर्वांनुमते संमती दिली. याप्रसंगी विविध शाखेचे पदाधिकारी डोमा महाराज, दिवाकर मोरस्कर , डाॕ. संजय निंबेकर , सुबोध कान्हेकर , पवन पाथोडे ,पालिकचंद बिसने,पंडीत लोंढे आदी उपस्थित होते.

हे संमेलन वेगळ्या प्रकारचे होणार असून दळणाची गाणी,रोवण्याची गाणी,ददरीया इ. लोकगीतासोबत दंडार , खडीगंमत,डहाका या लोकनाट्यप्रकाराचा आस्वादही सर्वांना घेता येणार आहे. म्हणजेच प्रबोधनासोबात मनोरंजनाची मेजवानी या निमित्ताने मिळणार आहे. अर्जुनी मोरगाव ते बारव्हा या मार्गावर हे गाव असून नियोजित स्थळाला मंडळाच्या वतीने बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर ,गडचिरोली जिल्हाध्यक्ष डाॕ.चंद्रकांत लेनगुरे , नंदू मसराम ,लक्ष्मण खोब्रागडे ,संतोषकुमार उईके, रामकृष्ण चनकापुरे , सुखदेव चौथाले , सौ. चौथाले आदींनी भेट दिली आणि स्थानिक मंडळीशी चर्चा केली.
————————

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED