आश्लेषा बारसिंग हिची कला क्षेत्रात उंच भरारी

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.12ऑक्टोबर):-स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन सातारा,पुणे.संचालक स्वप्निल पुराणिक यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जर्मनी, बहरीन, ऑस्ट्रेलिया,आफ्रिका, पाकिस्तान, कॅलिफोर्निया, मलेशिया इत्यादी जगभरातील मराठी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एकपात्री प्रयोगाचेही आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कु.आश्लेषा अविनाश बारसिंग (वयोगट ५-१५) हिने आपला कलाविष्कार सादर करून द्वितीय क्रमांक पटकावल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेत्री श्रुती पुराणिक,प्रमुख अतिथी म्हणून हास्यजत्रा फेम ओंकार भोजने तर मुख्य अतिथी म्हणून सौ.विशाखा सुभेदार तसेच अध्यक्ष म्हणून मा.अर्जुन पुतलाजी (मराठी सांस्कृतिक केंद्राचे चेअरमन,मॉरिशस) यांची उपस्थिती लाभली. कु.आश्लेषा ही नवोदय विद्यालयाची अष्टपैलू विद्यार्थिनी आहे.विध्याल्याचे शिक्षक,मुख्याध्यापक यांनी तिचे कौतुक केले

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED