दादासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्य टोम्पे महाविद्यालयात आरोग्य निदान व तपासणी शिबिर व जीवनावश्यक वस्तू दान

28

✒️विशाल इंगोले-अजातशत्रू(चांदुर बाजार,विशेष प्रतिनिधी)मो:-7083248705

चांदुर बाजार(दि.13ऑक्टोबर):- गो. सी टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार येथे संस्थाध्यक्ष दादासाहेब टोम्पे यांच्या ८० व्या वर्षात पदार्पण निमित्य राष्ट्रीय सेवा योजना आयोजित आरोग्य निदान व तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भास्करराव टोम्पे, सचिव होते तर म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ‌. पवन अग्रवाल (कार्डियोलॉजिस्ट), डॉ‌. सिकंदर अडवानी (न्युरोलॉ‌जिस्ट) डॉ‌. आनंद काकानी (न्युरोसर्जन), डॉ. प्रणित काकडे (नेफरोलॉजिस्ट), डॉ. अक्षय चांदुरकर (नुरोसायकिअट्री) सर्व रेडीएन्ट सुपरस्पेसियालिटी हॉस्पिटल, अमरावती लाभले होते आणि श्री. राजेशजी ढगे, प्रा. डॉ विजय टोपे, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके व प्राचार्य डॉ. संजय शेजव मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरवात संस्थापक अध्यक्ष गोविंदराव टोम्पे यांच्या पुतळयाच्या हारार्पण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. विजय टोम्पे यांनी देत डॉक्टरांच्या कार्याचे महत्व कोरोना काळात प्रत्येक माणसाला कळल्याची भावना व्यक्त केली.

सदर आरोग्य निदान व तपासणी शिबिराची सुरवात सर्व डॉक्टरांच्या हृदय विकार, हार्ट अटॅक, स्ट्रोक पॅरालीसीस व लकवा यांची कारणे आणि सावधगिरी या विषयावर मार्गदर्शनाने झाली. या प्रसंगी डॉ. आनंद काकाणी यांनी स्वर्गीय गोविंदराव दादा टोम्पे यांनी ग्रामीण भागातील सर्व गोरगरिबांच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून या भावी शिक्षण संस्थेची स्थापना मोठ्या उदात्त हेतूने केले आहे असे मत व्यक्त करत रेडिएन्ट हॉस्पिटला नवीन अद्यावत आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाचे सोय उपलब्ध असून तज्ञ डॉक्टरांनी अनेक रुग्णाचे प्राण वाचवले असल्याचे अनेक दाखले दिलेत. डॉ. सिकंदर अडवाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात आजार होण्या अगोदर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. संपूर्ण जगात प्रत्येक चार सेकंदाला एकाला व्यक्तीला स्ट्रोक येत असतो. अचानक हात पाय जड पडणे, अचानक कमी दिसते, अचानक बेहोष होणे अशी लक्षणे स्ट्रोकची असतात पण लगेच वेळीत आपण त्याची लक्षणे व धोका लक्षात घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. डॉ. पवन अग्रवाल यांनी आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन मध्ये हृदय विकाराचा संदर्भात माहिती देताना सध्या हृदयविकाराचे प्रमाण माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे झाले असून व्यसनाधीनता, खाण्यापिण्याचे बदल, कामाचे टेन्शन व अवेळी झोप अशा विविध कारणांमुळे हृदयविकार होतो असे त्यांनी सांगितले.

हृदयविकार खर्चिक असल्यामुळे व योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे भारतात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व नियमित तपासणी करावी, व्यायाम करावे, स्वतःला तंदुरुस्त ठेवावे असा सल्ला उपस्थितांना दिला. डॉ. प्रणित काकडे यांनी वैद्यकीय सल्ला देतांना प्रत्यक्ष प्रात्याक्षित करून उपस्थितांना अतिप्रमाणात मिठामुळे होणारे आजारावर भाष्य करत प्रत्येक व्यक्तीने आपल्या रोजच्या जेवणात योग्य मीठ घेतले पाहिजे, त्यामुळे बीपी संतुलित राहते तसेच जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन चा आजार उद्भवतो. त्यामुळे आपण दिवसा तसेच रात्रीला सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे असा मौलिक सल्ला देत आपल्या नातेवाईकाचा दुदैवी मृत्यू अथवा ब्रेन डेड झाल्यास अवयव दान करून इतरांना जीवदान द्यावे असा मूल्यवान मंत्र दिला. डॉ. अक्षय चांदूरकर यांनी मनोरुग्णतेच कारण सागंत चांगली झोप, दररोज व्यायाम, संतुलित आहार आणि कोणतेही काम सहजपणे करणे या गोष्टीचे पालन केल्यास स्ट्रेस कमी होतो तसेच चिडचिडेपणा वाढत नाही. मात्र आजकाल कामाच्या अधिक स्ट्रेस मुले मानसिक आरोग्य धोका असतो असून त्यामुळे अनेक आजार उदभवत असल्याचे उदाहरणासह स्पष्ट केले.

यानंतर सर्व डॉक्टर्स व त्यांच्या टीमने आरोग्य निदान व तपासणी शिबिरात सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांचे शुगर, सीबीसी, बीएमआय, बीपी तसेच ईसीजी तपासणी महाविद्यालयात करण्यात आले आणि गरजू रुग्णांना योग्य सल्ला दिला तर लिपिड प्रोफाइलची टेस्ट रेडिएन्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रम नंतर दादासाहेबांच्या वाढदिवसानिमित्य विसावा वृद्धाश्रमात गहू, तांदूळ, डाळ, कडधान्य अन्नधान्य व किराण्यातील तेल, साबण व इतर जीवनावश्यक वस्तू वाटप राष्ट्रीय सेवा योजना द्वारे करण्यात आले. रेडीएन्ट सुपरस्पेसियालिटी हॉस्पिटलच्या टीम मध्ये डॉ. सारंग लकडे, डॉ. महिमा हेडा, पीआरओ श्री. पवन इंगोले, श्री. हरिष कुकलकर, श्री. राहुल कुकलकर तर नर्सिंग स्टाफ मध्ये विमला शहारे, पूनम रामटेके, सुरूची मगर, वैशाली बेलकर, दिपाली पकडे, प्रणाली घरडे यांनी आरोग्य निदान व तपासणी करण्यास मदत केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्राचार्य डॉ. संजय शेजव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण परिमल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आयोजन समिती, बीएड विद्यार्थी, स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले.
—– — —
📌 सध्य स्तिथीत भेडसावत असलेल्या हृदय विकार (हार्ट अटॅक), स्ट्रोक ( पॅरालीसीस, लकवा ) यांची कारणे समजणे आणि सावधगिरी बाळगणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे” – डॉ‌. सिकंदर अडवानी.