नवोदय उत्तीर्ण मिनल गायकवाड हिचा सत्कार – पर्यावरण संवर्धन समीती नेरीचा स्तुत्य उपक्रम

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

नेरी(दि.13ऑक्टोबर):-चिमुर तालुक्यातील नेरी वरुण अगदी 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या खुटाळा या छोट्याशा गावी मिनल गुणवंत गायकवाड या मुलीनी नवोदय परिक्षेत उत्तीर्ण झाली. कोरोणा महामारीचा बिकट परिस्थिती शाळा बंद असतांनाही जिद्द व चिकाटी वर तिने नवोदय परिक्षेत उंच भरारी घेतली.मिनलच्या शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मिनलच्या घरचे वातावरण हे शैक्षणिक असल्याने कोरोना या महामारीच्या संकटात सुद्धा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून नवोदय परिक्षा उत्तीर्ण केली.

आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद व आई वडील यांना दिले.पुढे सुंद्धा तिच्या शैक्षणिक कार्यात जिद्द , चिकाटी निर्माण व्हावी व असेच यश संपादित करावे यासाठी पर्यावरण संवर्धन समीती नेरी कडुन वृक्ष देऊण सरकार करण्यात आला यावेळी पर्यावरन संवर्धन समीती नेरी चे अध्यक्ष कवडू लोहकरे, सूशांत इंदोरकर, राहुल गहूकर आदी पर्यावरण संवर्धन समीती सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, शैक्षणिक, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED