नाशिक येथे गुन्हेगारांकडून जप्त केलेले साडेतीन कोटी चा मुद्देमाल नागरिकांना परत

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.13ऑक्टोबर):- शहर पोलिसांनी गुन्हेगारांकडून जप्त केलेला मुद्देमाल मंगळवारी दिनांक 12 पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला सोने चांदीचे दागिने मोटरसायकली मोबाईल फोन रोख रक्कम व अन्य असा मुद्देमाल समावेश होता गेल्या वर्षभरात सर्व पोलीस ठाणे व शहर गुन्हे शाखांनी हस्तगत केलेल्या मुद्दे मालाचे वितरण पोलीस आयुक्तालय पार पडले यावेळी पोलीस आयुक्त पांडे यांच्या हस्ते तीन कोटी 50 लाख 90 हजार 650 रुपया च्या मुद्दे मालाचे वितरण पोलीस आयुक्त यांनी केले.

या मुद्देमाल वितरण सोहळ्यात फिर्यादी अर्चना अर्चना धात्रक कल्पना क्षीरसागर संदीप जगताप ईश्वर गुप्ता वामन निकम विशाल शर्मा समीना शेख किशोर जोशी बबन बोराडे प्रकाश भारती आदींनी मनोगत व्यक्त करीत पोलीस खात्याचे आभार मानले दरम्यान या गुन्ह्याचा तपास करताना काही अडचणींचा सामना करावा लागतो हे गुन्हे उघडकीस आले याविषयी शहर गुन्हे शाखेचे मध्यवर्ती युनिट सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे युनिट एक पोलीस नाईक प्रवीण वाघमारे आदींनी आपले अनुभव कथन केले कार्यक्रमात सर्व फिर्यादी त्यांचे कुटुंबीय पोलीस उपायुक्त संजय बारकुंड अमोल तांबे विजय खरात पौर्णिमा चौगुले सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे आधीच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते