म्हसवड शहर बंदला 100℅ पाठींबा : बाळासाहेब मुलाणी

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.13ऑक्टोबर):-उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून सोमवार दिनांक 21 रोजी महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या माण तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व आत्यावश्यक सेवा वगळून 100% बंद यशस्वी झाल्याचे माण तालुका शिवसेना प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांनी सांगितले.

म्हसवडमध्ये सकाळी सात वाजल्यापासून शहरातील व्यापारी बांधवांनी आणि म्हसवडकर नागरिकांनी स्वयंपूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवून लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करणेत आला. शेतकरी आंदोलनाला पाठींबा देऊन शेतकर्याप्रयी आदर व्यक्त करून बंदमध्ये म्हसवडकर जनतेने सहभागी होऊन शेतकऱयांना पाठींबा दिल्याचे बाळासाहेब मुलाणी यांनी सांगितले.

यावेळी म्हसवड शहर बंद करनेकामी म्हसवड शहर प्रमुख राहुल मंगरूळे, उपतालुका प्रमुख शिवदास केवटे,विध्यार्थी शहरप्रमुख सोमनाथ कवी,महिला आघाडीप्रमुख पूनम माने,उपशहरप्रमुख आनंद बाबर व बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.म्हसवड शहर बंदला शहरातील जनतेने आणि व्यापारी वर्गाने पाठींबा दिल्याबद्दल तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांनी म्हसवडकर जनतेचे आभार मानले आणि धन्यवाद दिले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED