वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीत कोविड-19 मध्ये सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारने प्राध्यान्य द्यावे – एमपीजे

25

✒️सिध्दार्थ दिवेकर(प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.13ऑक्टोबर)ए आणि डी गटा अंतर्गत सुमारे 12 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल अशी घोषणा महाराष्ट्र चे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली राज्य सरकारने हजारो रिक्त पदावर विविध आरोग्य कर्मचाऱ्यांची पुर्नेंनियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

खरेतर कोरोनाविषाणू च्या विनाशा नंतर सरकारने आजारी आरोग्य प्रणालीत सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील प्रसिद्ध सामाजिक संघटना मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टीस ने या पुनर्नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आणि राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर आणि इतर परा मेडिकल कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती ची मागणी करत सर्व भरतीमध्ये कोविड-19 मध्ये सेवा देणाऱ्या बिगर सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. शहरातील स्थानिक एमपीजे संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हणटले आहे की,आम्ही या बहुप्रतीक्षित निर्णयाचे स्वागत करतो.

खरे तर आम्ही राज्य सरकारला वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे
भरण्याची विनंती अनेकदा केली आहे. राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याची विनंती आम्ही आरोग्यमंत्र्यांना केली होती.
या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासनही मंत्र्यांनी आम्हाला दिले होते.

निश्चितच राज्य सरकारने सुरू केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती प्रक्रियेमुळे आपली आरोग्य व्यवस्था बळकट होईल. कोविड-19 दरम्यान आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत आणि या काळात त्यांच्यापैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

साथीच्या रोगाच्या काळात आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून आपले कर्तव्य बजावले आहे.

साथीच्या या कठीण काळात महत्त्वाची भूमिका बजावणारे सरकारी आणि खाजगी वैद्यकीय कर्मचारी दोघेही डॉक्टर आणि इतर पॅरामेडिकल कर्मचारी हे कोविड-19 च्या विरोधात आघाडी चे सैनिक आहेत म्हणूनच प्राण वाचविण्यासाठी आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे आपले नैतिक कर्तव्य आहे म्हणूनच आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की की डॉक्टर आणि इतर पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये त्या खाजगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचा विचार करावा.

जे covid-19 च्या विरोधात मध्ये विरोधात सैनिक म्हणून देशाची सेवा करीत आहेत तसेच लोकसंख्येनुसार राज्याच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याची आम्ही पुन्हा एकदा पर्यंत करीत आहोत.

अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

निवेदन देतांना एमपीजे चे उपाध्यक्ष इरफान शेख, मुख्तार शहा, सहसचिव समीर मुस्तफा, प्रकाश चव्हाण,मिनाज अहेमद, शेवाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.