सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी यांच्याकडून गोरोबा काका कुंभार यांची प्रतिमा मंडळाला भेट

🔸गायत्री चौधरीचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.13ऑक्टोबर):– नवरात्रोत्सव निमित्ताने सतत १८ वर्षाची परंपरा असलेली संत गोरोबा काका कुंभार मित्र मंडळ कुंभार वाडा येथे दुर्गा मातेची आरती करतांना व संत गोरोबा काका कुंभार यांची प्रतिमा तिळवण तेली समाज अध्यक्ष – कर्तव्य बहुदेशिय संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांच्या हस्ते भेट देण्यात आली .

राष्ट्रीय पक्षी मोर याची सुंदर अशी रांगोळी गायत्री चौधरी हिच्या हस्ते काढण्यात आली होती कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे संचालिका सौ. सुरेखा सुनील चौधरी यांच्या हस्ते गायत्रीचा देखील सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मंडळाचे रवी पाटील, आकाश कुंभार, गोपाल कुंभार, मारोती कुंभार, दिगंबर कुंभार, भिका कुंभार, भुरा कुंभार, विनोद कुंभार, गणेश कुंभार, महेंद्र कुंभार, संदीप कुंभार, कालू कुंभार, मोहन कुंभार, शहादू कुंभार, शरद चौधरी, गोपाल चौधरी, विशाल चौधरी, कल्पेश चौधरी, कृष्णा कासार, सागर चौधरी, मयुर चौधरी, माधवराव काका चौधरी, मनीष चौधरी,
व आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED