गंगाखेड शुगरच्या १२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13ऑक्टोबर):-शुगर अन्ड एनर्जी लि. कारखान्याचा सण २०२१- २०२२ च्या १२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीप समारंभ कार्यक्रम विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच दि : १५ ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आलेला असून सदरचा कार्यक्रम मागील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये कारखान्यात सर्वात जास्त ऊस पुरवठा करणारे प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी श्री निवृत्ती वाल्मीक फड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सयाबाई निवृत्ती फड यांच्या शुभहस्ते तसेच कारखान्याचे प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सदर कार्यक्रम शासन नियमाच्या अधीन राहून मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED