पोलिसांची मोठी कारवाई साडे सात लाखाचा गुटखा जप्त

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13ऑक्टोबर);- येथील नूतन पोलीस उपाधीक्षक श्रेनिक लोढा यांची गुटखा चोरून विकणाऱ्या वर मोठी कारवाई महाराष्ट्र राज्यात तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असताना देखील परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात होऊन खुलेआम विक्री होत आहे. गंगाखेड शहरात गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या पथकाने छापा टाकून साडेसात लाखाचा गुटखा जप्त केल्याची घटना 12 ऑक्टोबर रोजी घडली.

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथून शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटका गंगाखेड शहराकडे विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळाताच पोलिस उपअधीक्षक श्रेनिक लोढा यांना यांनी छापा टाकून ७ लाख ४१ हजार ९९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गंगाखेड पोलीस स्टेशन येथे जितेंद्र ऊर्फ बाळू गणपत मुंडे, इम्रान सलीम शेख, संजय बापुराव मुसळे, राम फड या पाच संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना अटक करण्यात आली असून दोन संशयित फरार आहेत.गुटख्याच्या कारवाईने काही प्रमाणात का होईना आळा बसला आहे.