राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळरात्री देवी व आरोग्य भवानी डोंगरतुकाई येथे मोफत वाहनसेवेचा शेकडो नागरिक घेत आहेत लाभ

29

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.13ऑक्टोबर):- राज्याचे समाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी वैजनाथ द्वारा शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून नवरात्रोत्सव निमित्त काळरात्री मंदिर ते अंबाआरोग्य भवानी डोंगरतुकाई मंदिर दर्शनासाठी सकाळ ते संध्याकाळ भाविकांना मोफत वाहन सेवा अविरत सुरु असून नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पासून भाविक-भक्तगण मोठ्या संख्येणे वाहन सेवेचा लाभ घेत आहेत.

ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते घटस्थापनेच्या दिवशी या विशेश बससेवेस प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर आता परळीकर नागरिक मोठया संख्येने या बस प्रवासाचा आनंद नवरात्रीत घेताना दिसत आहेत.