आमदार प्रणिती शिंदे यांची मा. नितीन करीर यांच्यासमवेत सोलापूरातील विविध विषयांबाबत बैठक संपन्न

20

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.13ऑक्टोबर):- आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील विविध प्रश्नांसंदर्भात मा. श्री. नितीन करीर साहेब, अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे बैठक आयोजित केली होती यावेळी संबंधित शिष्ठमंडळ उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये सोलापूर शहरातील नरसिंग गिरजी चाळ भाडेकरू सहभागीदारी सह. संस्था मर्यादित संस्थेतील बंद पडलेल्या नरसिंग गिरजी मिल कामगारांच्या नावे हस्तांतर होण्यासाठी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ विभाग 2 कोटी रक्कम भरण्यास तयार असून उर्वरीत रक्कम खासबाब म्हणून महसूल विभागाकडून माफ करण्यात यावी व सदर प्रलंबित प्रकरणाचे निकाल होवून त्यांच्या नरसिंग गिरजी चाळ भाडेकरू सहभागीदारी सह. संस्था मर्यादित संस्थेतील कामगारांच्या नावे हस्तांतर करण्यात यावे.

मोतीलाल मोची बॅकवर्ड क्लास को-ऑप हौसिंग सोसायटीतील सभासदांना महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्स कार्पोरेशन लि., मुंबई या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेवून 134 सदनिकांचे बांधकाम करून वाटप केले आहे. तसेच सदर संस्थेतील रहिवाश्यांकरीता खेळाचे मैदान, वाचनालय, व्यायाम शाळा व समाज मंदिर इ. कारणांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. परंतू सदर संस्थेचे चेअरमन/सेक्रेटरी यांनी राखीव जागेवर नवीन 39 बेकायदेशीर सभासंदांसाठी नवीन प्लॉट पाडत आहे. याबाबत संस्थेतील सभासदांनी मा. जिल्हाधिकारी, सोलापूर आणि मा. उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संस्थेची चौकशी करून मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशातील अटी व शर्तीचे भंग केल्याने चेअरमन/सेक्रेटरी यांना संस्थेचे मुळ कागदपत्राची मागणी करून कागदपत्रे सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. सदर मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता न केल्यास संस्थेला दिलेली जमीन सरकार जमा करण्यात येईल असे नोटीस बजावण्यात आलेले आहे या अडचणी दुर बाबत.

तसेच सोलापूरात वडार समाज हा गेली अनेक वर्षे राहत असून या समाजाची लोकसंख्या सुमारे 70 ते 90 हजारांच्या आसपास आहे. हा समाज गरीब कष्टकरी असून पोट भरण्यासाठी गावोगावी भटकंती करीत असतात. त्यामुळे हा समाज अशिक्षित राहिलेला असून हा समाज अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दगड खाणी माळढोक अभयारण्यासाठी बंद केल्यामुळे या दगडखाणीवर अवलंबून असलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जवळपास दिड लाख कामगारांचा रोजगार हिरावून घेतल्याने चालू स्थितीतील दगड खाणीतील उत्पादन शासनाच्या 12 जुलै 2006 रोजीच्या आदेशाने बंद केल्याने 12 दगड खाणीतील मजूरांना उपासमारीमुळे जगणे कठिण झालेले आहे. प्रत्येक जाती जमातीत पूर्वापार पिढीजात चालत असलेला एक व्यवयाय असून त्यांच्याशी त्यांच्या प्रथा, रुढी व संस्कृती जोडलेली आहे. त्याचप्रमाणे त्याचा समाज देखील दगड फोडणे, मातीकाम करणे, बांधकाम करणे हा पिढीजात व्यवसाय करीत आहे. सन 2017 पासून राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांना त्यांच्या खाणीबाबत दंड न लावता 30 दिवसाची रॉयल्टी भरण्यासंबंधीची नोटीस देवून रॉयल्टी भरून घेतली जाते. त्यांच आधारे व्यवसाय म्हणून वडार समाजातील खाणधारकांना सुध्दा दंड न लावता 30 दिवसाची रॉयल्टी भरण्याची नोटीस देवून विशेष बाब म्हणून रॉयल्टी भरून घेण्यात यावी याबाबत व तसेच विविध प्रश्नांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

याबाबत मा. श्री. नितीन करीर साहेब, अप्पर मुख्य सचिव यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, वरील नरसिंग गिरजी चाळ भाडेकरू सहभागीदारी सह.संस्था मर्यादित, सोलापूर येथील बंद पडलेल्या नरसिंग गिरजी मिल कामगारांच्या नावे हस्तांतर होण्याकरीता वस्त्रोद्योग मंत्र्यांकडून कॅबिनेटकडे प्रस्ताव पाठविणार, मोची बॅकवर्ड क्लास को-ऑप हौसिंग सोसायटीतील सभासदांवर अन्याय होणार नाही. तसेच वडार समाजाच्या दगड खाणीवरील बंद काळातील सर्व थकीत रॉयल्टी भरून दंड माफ होण्याकरीता लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे व संबंधित शिष्ठमंडळांना दिले.

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, शंकर चौगुले, लक्ष्मण विटकर, विजय भुईटे, बाबा करगुळे, देवेंद्र भंडारे, नागनाथ कासलोलकर, बाबू म्हेत्रे, प्रल्हाद म्हेत्रे व इतर सभासद उपस्थित होते.