एनसीबीच्या विरोधात थेट शरद पवार यांची आक्रमक भूमिका !!

34

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.13ऑक्टोबर):-”सत्तेचा गैरवापर करुन केंद्र सरकार महाविकास आघाडीला टार्गेट करीत आहेत. महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आघाडी सरकारमधील नेत्यांना नाउमेद करण्याची स्टे्टजी आहे. पण याची चिंता आम्ही करीत नाही,” असे आदरणीय शरद पवारसाहेब म्हणाले.

केंद्राच्या यंत्रणा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. त्यात आता NCB ची भर पडली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे याआधी विमानतळावर एक्साईज विभागात होते. तिथेही काही कथा त्यांच्या मला ऐकायला मिळाल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी सांगितले. या एजन्सीचे मिडीया मॅनेजमेंट चांगले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

एनसीबीच्या विरोधात थेट शरद पवारसाहेब यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. पवार यांनी पत्रकार परिषदेत आज बोलताना एनसीबीच्या निवडक कारवायांविषयी भाष्य केले. ते म्हणाले, ”अमलीपदार्थ विरोधी कारवायांसाठी दोन एजन्सी कार्यरत आहेत. एक एनसीबी आणि दुसरी मुंबई पोलिसांची. गेल्या काही वर्षांत एनसीबीने अमली पदार्थांची किती रिकव्हरी केली याची माहिती घेतली तर त्याचे प्रमाण खूप कमी आहे. कुठे पुडी, कुठे काय, कुठे काही ग्रॅम वगैरे, अशा कारवाया त्यांनी केल्या आहेत. याउलट मुंबई पोलिसांनी केलेल्या जप्तीचे प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीपेक्षा खुप मोठे आहे. त्यामुळे राज्याची एजन्सी प्रामाणिकपणे काम करते आणि केंद्राची मुंबईतील एजन्सी काहीतरी करतो असे सरकारला दाखवण्यासाठी काम करते.