मुंबई कोळीवाडे आणि गावठाण हक्क चळवळ!

सध्या हा खूप चर्चेत असलेला विषय आहे!. यातील काही गैरसमज दूर करण्यासाठी हा लेख आहे. मुबंईत गाव गावठाण हा शब्द उच्चारणे हे तेथील गावकरी सरकारी अधिकारी बिल्डर आणि बाहेरून आलेले नागरिक या सर्वानाच लाजिरवाणे वाटत होते एव्हढी या शहराची अहंकारी मानसिकता होती! जणू मुबंई म्हणजे पंचतारांकित स्वप्न नगरी?.प्रत्येक शहराचा जन्म हा गाव खेड्यातूनच होतो,जसा नदीचा उगम झऱ्यातून होतो.मुबंईचे वास्तव तेच आहे.येथील मूळ मालक आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन या मच्छिमार सागरी जातींचे लोक स्वतःच्या गावात हजारो वर्षापासून राहत आहेत.एका जागतिक व्यापारी शहराला आवश्यक असे सर्व जाती धर्म वंशाचे लोक आज मुबंई चे वैभव वाढवीत आहेत.

तरीही आपापल्या जाती धर्म पंथ यांच्याच हिताचा विचार लोक प्राधान्याने करतात..? यात मुबंईच्या भूमीपुत्रांच्या हक्कांचा विचार त्यांनी स्वतःच केला पाहिजे हे भारतातले जात वास्तव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शोधले आणि उच्चजातीय मानसिकतेच्या या देशात प्रथमच स्त्रिया ओबीसी एससी एसटी या 85 टक्के मागास वर्गाच्या उत्कर्षाचा नवा “आधुनिक भारतीय राष्ट्रवाद” त्यांनी मांडला.मी देशाच्या विकासाचा विचार करीत असताना सगरकिनाऱ्यावरील माझ्या गाव गाठणाचाही विचार केला पाहिजे ही डॉ बाबासाहेब आंबेडकर आदरणीय नारायण नागु पाटील यांच्या जमीन हक्क आंदोलनाचीच प्रेरणा आहे!.महाराष्ट्र सरकारने आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन यांच्या मुबंई तील वस्त्यांना “एसआरए” म्हणजेच गलिच्छ वस्त्या, झोपडपट्ट्या घोषित केल्यानंतर मला मनातून संताप आला.या रागाचे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली मानवी हक्कांची संविधानिक जीवनदृष्टी हेच होय.

म्हणूनच जयेश आकरे माहीम यांनी वरळी येथील सभेत मला बोलावले असताना, भाजप शिवसेना सरकारच्या आमदार आशिष शेलार याना कोणताही संकोच न ठेवता मी जाब विचारला आम्हाला sra म्हणजे गलिच्छ वस्त्या म्हणणारे तुम्ही कोण?. या संतापाची तीव्रता खूप मोठी होती ती आमदार शेलार याना समजली असावी?. हा क्षण आमदार शेलार यांच्या मराठा ब्राह्मण सीकेपी या उच्चजातीय सरंजामी जमीनदारांच्या सरकारला ओबीसी मागास वर्गीय तरुणांनी विचारलेला आमच्या अस्तित्वाचा खडा सवाल होता.गलिच्छ वस्ती सुधार योजना या नावाखाली मुबंई महानगर पालिका (शिवसेना)आणि महाराष्ट्र सरकार यांनी दिलेली विधिमंडळातील तिरस्कार युक्त शिवी माझ्या जात बांधवाना कळलीच नाही हे वास्तव होते. मागील तीस वर्षे अनेक जण दिल्लीत जाऊन सीआरझेड कायद्यावर काम करीत होते आणि आहेत परंतु आमची नोंद मुबंई च्या जमिनीवर कशी घ्यावी हा प्रश्न सरकारला कुणीच विचारला नव्हता?.

आता सरकारचे प्रतिनिधी आमदार शेलार यांनी विचारले या कोळीवाड्याना जमीन मालकी कशी देणार?त्यावेळी महाराष्ट्रात ग्राम पंचायत अधिनिमा अंतर्गत गावठाण विस्ताराचे तत्व अभ्यासून मी सांगितले, “गावठाण कायद्यानेच!” शेलार म्हणाले “काही बिल्डर याला कोर्टात आव्हान देतील”.तेव्हा मी म्हणालो आम्ही सर्व गावठानांच नवे, अगदी तुमच्या मराठा जातीच्या क्रांती मोर्चा सारखे आंदोलन उभे करू! मोठा संघर्ष करू! त्यानंतर मुबंईतील 200 गावठाणे यापूर्वीच्या कोणत्याच सरकारला सत्तर वर्षे दिसली नाहीत ती आमदार आशिष शेलार .मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधिमंडळात चर्चेत आणली. ही खरोखरच ऐतिहासिक गोष्ट आहे.आजच्या शिवसेना महाविकास आघाडीला हे फार मोठे रराजकीय सामाजिक न्यायाचे आव्हान आहे.त्यांनी राहिलेले काम करावे ही माझी विनंती आहे.अर्थात महाराष्ट्रातील उच्चजातीय नेतृत्व हे मुबंईच्या जमिनी विकूनच जगते हे वास्तव आम्ही आता स्वीकारले पाहिजे म्हणूनच कोळीवाडे ही वस्ती गावठाण नाही असा प्रचार एका दादरमधील आर्किटेकटने अत्यन्त विकृतपणे प्रथम सुरू केला त्यास काही बांधव बळी पडले यातून सायन कोळीवाड्याचा कपटाने बळी देण्यात येत आहे.

बांधवांनो सगळे द्रव पदार्थ जसे लिटर मध्ये मोजतात कारण द्रव पदार्थ मोजण्याचे ते एकक आहे.त्याच प्रमाणे कोळी आगरी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन यांची आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व जातींची वस्ती मोजण्यासाठी गावठाण कायद्याने सीमांकन अर्थात विस्तारित गावठाण हे एकच एकक आहे.त्यातून कोळीवाडे वेगळे करणे म्हणजे भूमाफिया बिल्डर आणि मागासवर्गीय जातीच्या विरोधी असलेल्या उच्चवर्णीय मानसिकतेच्या प्रशासनाला मोकळे रान करून देणे होय.
कोळीवाडे गावठाणे हे आम्ही मोजले पाहिजेत ते सरकार वर सोपविणे हा मूर्खपणा ठरेल कारण सरकारच्या माध्यमातून राजकारणी बिल्डर युती भूमाफिया होऊन या आमच्या जागा लुटत आहेत. सीआरझेड कायद्याचा बागुलबुवा उभा करण्यापेक्षा गावठाण मोजा! गावाबाहेर शेकडो एकर जमिनीची वहिवाट आमचीच आहे.याआपली सर्व ताकद गावठाण जमीन हक्कासाठी लावा.त्यावर दावा करण्यासाठी तरुणांनी सकाळी गावाला चालून फेरफटका मारला पाहिजे.ज्यांनी स्वतःचे घर त्याभोवतीची जागा कधी मोजली नाही त्यांना गावठाण विस्तार कसा कळणार?.

लोकनेते दि बा पाटील नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामविस्तार आंदोलनाने ठाणे रायगड पालघर मुबंई या परिसरात चांगली जागृती आली आहे. केंद्र सरकारने “स्वामित्व योजना” नावाची गावठाण हक्कासाठी पर्यायी योजना आणली आहे.जी गुगल युट्युबर प्रसिद्ध झालीय!फेसबुक वॉट्सप यावरील कागदी घोड्यांच्या धावण्याची फसवी शर्यत थांबवा. गावे मोजून प्रस्ताव देण्यासाठी गाव कमिटी करा.गावठाण हक्क म्हणजे जमीन हक्क हा लढूनच मिळेल! आम्ही गरीब दुबळे आहोत मायबाप सरकारने आमच्यावर कृपा करावी अशी याचना करणारी लाचार मंडळी सरकार दरबारी भीक मागत फिरत आहेत ही अत्यन्त वाईट मानसिकता आहे. मात्र मुबंईत वरळी कोळीवाडा गावठाण गाव पाटील जमात ही पोलादी गावकमिटी आणि जमीन कायद्याने स्वतःच्या नावे करून स्वाभिमानाचा आदर्श देत आहे!…येथील विजय वरळीकर हे मुबंईतील एक वयोवृद्ध अनुभवी योध्याप्रमाणे लढत आहेत.अर्थात जमीन हक्कांबाबत त्याच्याकडील कागदपत्रांचा गावठाण हक्कासाठी मोठा आधार ठरेल!. आम्ही याआगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन सागरपुत्र जे लग्नात हुंडा नाकारतात जे स्त्रियांना सन्मान देतात ते जगातील सर्वांचे महान मातृसत्ताक संस्कृतीचे लोक आहोत.2000 वर्षांपासून म्हणजे सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात आम्ही जागतिक व्यापार आणि आरमारात बिनीचे सैनिक आहोत!आम्ही समुद्रात इंग्रज फ्रेंच पोतुरगीज मोगल यांचा पराभव केला तर हे शिवसेना कॉग्रेस राष्ट्रवादी भाजप हे सरंजामी राजकीय पक्ष आमच्याच गावठाणात आम्हाला जमीन हक्क नाकारण्याची हिम्मत कशी करणार?. धोका आमच्याच गद्दार गुलाम मानसिकतेच्या दलाल लोकांकडून होतोय जे गावठाण शिमांकन प्रॉपर्टी कार्ड यामागची जमीन हक्कांची वाघाची डरकाळी न फोडता आर्किटेक्ट बिल्डर राजकारणी यांनी फेकलेले तुकडे पाहून लाल गाळत आहेत .या घरभेदी गावठाण विरोधी लोकांचा शोध तुम्हीही घ्या! त्यांचा जाहीर निषेध करून तरुणांनी आता जमीन आणि समुद्राच्या मालकी हक्कांच्या लढाईत उतरावे असे जाहीर आव्हान करतो.

✒️लेखक:-राजाराम पाटील,उरण (अभ्यासक, गावठाण हक्क चळवळ)मो:-८९२८४५२११२

महाराष्ट्र, मुंबई, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED