मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी उचलले महिला सक्षमीकरणासाठी पाऊल

28

🔸मनसे चा महिला उद्योग मेळावा व कोरोना योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.14ऑक्टोबर):-मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित केलेला उद्योग मार्गदर्शन मेळावा व कोरोना काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका,आशा स्वयंम सेविका यांचा कोरोना योद्धा पूरस्कार वितरण सोहळा नांदूरघाट येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला.

या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष तथा मनसे चे सरचिटणीस संतोष नागरगोजे साहेब हे होते मनसे सदैव जनहिताची काम करत आहे येणाऱ्या काळात महिलांना उद्योग निर्मिती साठी जिथे जिथे मदत लागेल तेव्हा तेव्हा मनसे महिलांना मदत करेल,लवकरच महिकांसाठी गावा गावात उद्योग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत महिलांनी न डगमगता योग्य उद्योग निवडून आर्थिक सक्षम व्हावे मनसे आपल्या सोबत कायम आहे अशे मत अध्यक्षीय भाषणात संतोष नागरगोजे यांनी व्यक्त केले.

डॉ प्रा संजय गवई,यशस्वी उद्योजिका साधनाताई देशमुख ,आय सी आय सी आय बँकेचे शाखा व्यवस्थापक सुनील बिदादा,अश्रू भोसले,ग्रामीण स्वयंयम रोजगार प्रकल्प संचालक प्रमोद निनावे यांनी मेळाव्यास उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योगा विषयी जनजागृती व्हावी व ग्रामीण भागातील महिला उद्योग व्यवसाया कडे वळाव्यात या उद्देशाने महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे मत मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी प्रस्ताविक पर मनोगतात व्यक्त केले व मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांनी सूत्रसंचालन केले.

या उद्योग मार्गदर्शन मेळाव्यास बाल विकास अधिकारी केज लटपटे मॅडम, तालुका अभियान व्यवस्थापक नंदा ओव्हाळ मॅडम,बाल विकास प्रवेक्षिका कविता अडमुटे मॅडम, नांदूर प्रभाग उमेद संयोजिका शीतल गोरे मॅडम ,उषा शिंदे मॅडम, मनसे चे नांदूरघाट विभाग अध्यक्ष संतोष शिनगारे,मनसे चे शिरूर घाट पंचायत समिती अध्यक्ष गुणवंत सांगळे,मनसे नाहोली चे शाखा अध्यक्ष वामन बिक्कड,माळेवाडी चे अध्यक्ष गोविंद हाके,श्रीकांत वाघमोडे,कृष्णा कळसकर,अंकुश ठोंबरे,अंकुश बिक्कड आदींसह नांदूरघाट जिल्हा परिषद गटातील शेकडो महिला या उद्योग मार्गदर्शन मेळाव्यास उपस्थित होत्या