पारशिवनी तालुक्यात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

पारशिवनी(दि.14ऑक्टोबर) :- तालुका विधी सेवा प्राधिकरण , पारशिवनी , विधि सेवा प्राधिकरण नागपुर आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालय पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमानाने 11 ऑक्टोबर रोजी तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. हे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर सकाळी व दुपारी अश्या दोन सत्रात पारशिवनी तालुक्यातील लाल बहाददूर शास्त्री शाळा व महाविद्यालय बाबुलवाड़ा व हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , पारशिवनी या दोन शाळेत घेण्यात आले. दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे बेटी बचाव ,बेटी पढाओ संबंधी पोस्टर व बैनर , गावात प्रभात फेरी , पथनाट्य, रंगोली स्पर्धा , चित्रकला स्पर्धा आयोजित करून जनजागृती करण्यात आली.

सोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरणचें उपक्रम ,विधि सेवा, मनोधैर्य योजना , अन्य योजना विषयी माहिती आणि कायदेविषयक तरतूदी विषयी विधी स्वयंसेवक चंद्रभान कोलते यांच्या द्वारे कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करण्यात आले. लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयातील स्काउट गाइडच्या राज्य पुरस्कार परीक्षा व राष्ट्रपति पुरस्कार परीक्षासाठी निवड झालेल्या आर्यन तांदुलकर , सानिया सय्यद आणि आयेशा सय्यद या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय , हरिहर महाविद्यालय, रानी लक्ष्मीबाई विद्यालय सहित स्थानिक सहा शाळेचे निवडक विद्यार्थी व शिक्षकगण उपस्थित होते. पारशिवनी तालुक्यातील दिवानी सत्र न्यायालयचें न्यायाधीश श्री. कुलकर्णी, विधि स्वयंसेवक चंद्रभान कोलते, गट शिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, मुख्याध्यापिका राजेश्री उखरे, मुख्याध्यापक वानखेड़े इत्यादि उपस्थित होते .

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED