शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात प्रभावी वापर!

2191

दैनंदिन अध्यापनात शैक्षणिक साहित्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विषयानुसार प्रत्येक घटकांचे व त्या मधील लहान लहान तत्वाचे संबोध स्पष्ट होण्यासाठी शैक्षणिक साहित्य महत्त्वाचे ठरते.विद्यार्थी 85% ज्ञान डोळ्याने ग्रहण करतो. त्या नुसार शैक्षणिक साहित्य दोन बाजूने कार्य करते. एक म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहतो आणि दुसरा म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्ष हाताळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संबोध स्पष्ट होऊन तो घटक अधिक चांगल्या तर्हेने समजतो.अध्ययन, अध्यापन या प्रक्रिया एकमेकांशी निगडित आहेत. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढविणे. काही नवीन संकल्पनाचे दृढीकरण करणे होय. विद्यार्थी शिकला यांची साक्ष त्यांच्या वर्तनात दिसते. जे समजले नव्हते ते समजले व जे करता येत नव्हते ते करता येऊ लागले म्हणजे शिक्षण झाले. अध्ययन म्हणजे संस्कारग्रहण आणि वर्तनात परिवर्तन घडविण्यास साहाय्य करणे म्हणजे अध्यापन
होय. अध्ययन, अध्यापन क्रिया यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो.

साहित्य कसे वापरावे:-

विषयाला अनुसरुन, घटकाला अनुसरून असावे. विध्यार्थ्यांला योग्यरीत्या हाताळता येईल. साहित्य आकर्षक व मनोरंजनक असावे. साहित्य बाहुवर्गीय असावे. विषयानुसार साहित्य वर्गात असावे.

साहित्य निर्मिती का हवी:- प्रभावी अध्ययन, कृतीशीलतेला वाव, साहित्य हाताळण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी, नवनिर्मितीसाठी इत्यादी साठी साहित्य निर्मिती हवी.

साहित्याचे स्त्रोत:-
दगड, लाकूड, बिया, चिंचोके, शंख, शिंपले, पिसे, टाकाऊ वस्तू इत्यादी साहित्याचे स्रोत आहे.
साहित्याचे

प्रकार:-दृकश्राव्य साधन, श्राव्य साधन, चित्रे, मॉडेल्स, फ्लॅश कार्ड, संबोध स्पष्ट होणारे, दृढीकरण करणारे, मुल्यमापन करणारे, उपयोजन करणारे, बहुवर्गीय उपयोगी असणारे, असे विविध साहित्याचे प्रकार आहेत.

शैक्षणिक साहित्याची गरज:-अध्ययन अध्यापन क्रिया प्रभावी होण्यासाठी शैक्षणिक साहित्याची गरज आहे तसेच रंजकता निर्माण होण्यासाठी स्वयं अध्ययनासाठी संबोध स्पष्ट होण्यासाठी अध्ययन अध्यापनात शैक्षणिक साहित्याची गरज आहे.

साहित्य निर्मिती करताना घ्यावयाची काळजी:- साहित्य वर्गानुरूप व विषयानुरूप असावे. संबोध स्पष्ट होईल असे साहित्य असावे. टाकाऊ वस्तूचा जास्तीत जास्त वापर करावा. साहित्य खराब होणार नाही, फाटणार नाही याकडे लक्ष द्यावे.अध्ययन अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर केल्यास विद्यार्थ्यांचे ज्ञान चिरकाल व निरंतर टिकते. अभ्यासात मागे असलेला विद्यार्थी सुध्दा नियमित शाळेत येतो, आनंदाने शिकतो. म्हणूनच शैक्षणिक साहित्याचा वापर अध्यापनात प्रभावी ठरतो.

✒️लेखक:-विठ्ठल किसन गोंडे (विषय शिक्षक)जि. प. उ. प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा प. स.गोंडपीपरी जि प चंद्रपूर(मो:-9527480874)