सप्तशृंगी गडावर पायी जाणारी दिंडीला गणू महाराज यांच्याकडून जेवणाची व्यवस्था

32

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.14ऑक्टोबर):- धुळे तालुक्यातील साक्री जवळील शेवाळी फाट्याजवळ हॉटेल सन्मान येथे सप्तशृंगी गडावर पायी जाणारी दिंडी यात्रेकरूंना येथील गणू महाराज यांच्या कडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिंडीला भोजनाची व्यवस्था करण्यात आली.दिंडी खेतिया ते सप्तश्रुंगी गड 7 दिवस ही पदयात्रा असून त्यात 30 लोक सहभागी होते.

गणु महाराज यांच्याकडून हॉटेल सन्मान शेवाळी फाट्याजवळ येथे दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी जेवणासाठी सर्व सप्तश्रुंगी मातेचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी होते. तसेच पायी जाणाऱ्या भक्तांनी महाराजांचे आभार मानत पुढच्या रस्त्याने सप्तशृंगी मातेच्या गडाकडे जाण्यास सुरुवात केली.