चंद्रपूर महाकाली देवीच्या ऊपपीठाची गंगाखेडला स्थापना

24

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.14ऑक्टोबर):-चंद्रपूरची महाकाली देवी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवीच्या ऊपपीठाची गंगाखेड येथे स्थापना करण्यात आली आहे. गुंजेगावचे माजी सरपंच विक्रम ईमडे यांनी गोदातटावर या पीठाची स्थापना केली असून या माध्यमातून विविध सामाजीक ऊपक्रम राबवण्याचा निर्धार ईमडे यांनी व्यक्त केला आहे.

माजी सभापती बाळकाका चौधरी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, सामाजीक कार्यकर्ते सुधाकर चव्हाण, प्रा. शिवाजी कांबळे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत ऊपपीठ स्थापना करण्यात आली. देशावर आलेले कोरोना संकट टाळण्याचे गाऱ्हाणे यावेळी देवी भक्तांनी मांडले. या ऊपपीठाच्या माध्यमातून सतत विविध सामाजीक ऊपक्रम राबवले जाणार आहेत. यात प्रामुख्याने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला जाणार आहे.

या निमित्ताने एक झाड – एक शस्त्रक्रिया ऊपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती विक्रम ईमडे यांनी दिली आहे. शांतीदूत पुरस्कार प्राप्त विक्रम ईमडे हे गुंजेगाव चे २५ वर्षे बिनविरोध सरपंच होते. त्या काळी मागासवर्गींयांसह पाच हजार बांधवांची सार्वजनीक स्नेहभोजन पंगत घेवून ग्रामिण भागात त्यांनी आदर्श घालून दिला होता. या कार्याबद्दल ईमडे यांचा महाराष्ट्र शासनाकडून गौरवही करण्यात आला होता.

गंगाखेड येथे स्थापीत महाकाली ऊप पीठामुळे मराठवाड्यातील देवी भक्तांची दर्शनाची सोय होणार असून गंगाखेड शहराची महती वाढणार असल्याचा विश्वास ईमडे यांनी व्यक्त केला आहे.