17 ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचा चिमूर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित

25

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.14ऑक्टोबर):-संघटन समीक्षा व संवाद यात्रा संबंधाने वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने चिमूरच्या क्रांती भुमीत तालुका स्तरावर भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन १७ आॅक्टोंबरला करण्यात आले आहे. सदर कार्यकर्ता मेळावा हा अपना मंगल कार्यालयात होणार असून कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात दुपारी १२ वाजता होणार आहे.

संघटन समीक्षा व संवाद यात्रा निमित्ताने होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा विदर्भाचे मुख्य समन्वयक डॉ.रमेशकुमार गजबे, विशेष निमंत्रक सदस्य कुशल मेश्राम, विदर्भ समन्वयक राजू झोडे,अरविंद सांदेकर, जिल्हाध्यक्ष प्रवीण गावतूरे, महीला जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकार,जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, चिमूर तालूका निरिक्षक मधूकरराव उराडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भगीरथ वाकडे, कपूर दुपारे, स्नेहदीप खोब्रागडे, मधू वानखेडे,अश्विन मेश्राम, चिमूर तालुका अध्यक्ष नितेश श्रिरामे, चिमूर शहराध्यक्ष शालीक थूल, चिमूर तालूका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नागदेवते हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून ओबीसी, एससी, एसटी, विमूक्त भटक्या जाती जमाती व अल्पसंख्याक, समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार, त्यांच्या मुलभूत हक्काची होणारी पायमल्ली, यावर सुध्दा सखोल चर्चा करण्यात येणार आहे आणि याच विषयाच्या अनुषंगाने लढा देण्यासाठी व्युहरचना आखण्यात येणार आहे.

१७ आॅक्टोंबरला होणारा चिमूर तालुका स्तरावरील कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालूका पदाधिकारी व सदस्यगण,चिमूर शहर पदाधिकारी व सदस्यगण, कामाला लागले असून परिश्रम घेत आहेत.होणाऱ्या मेळाव्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चिमूर च्या वतीने करण्यात येत आहे.