वैज्ञानिक दृष्टिकोन अनुकरणानेच भारत प्रबुद्ध होईल : डॉ.संग्राम पाटील

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.15ऑक्टोबर):-अविद्देतून बोधी म्हणजेच अज्ञानातून प्रज्ञेकडे जाने हाच दुःख मुक्तीचा मार्ग असून विवेकी वर्तनाने धर्म वा धम्मानुकर हेच खरे मानवी धर्माचे खरे विज्ञान आहे,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर हे सामाजिक उत्थानचे क्रांतीपाऊल होते ज्याने जगातील तमाम प्रकारच्या गुलामांना मुक्तीचे वाट दाखवली आहे असे उदगार जागतिक कीर्तीचे प्रतिभा संपन्न वैद्य डॉ.संग्राम पाटील (लंडन) यांनी मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमी येवला यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२१ उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.धर्मांतर घोषणेचा ८६ वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून १३ ते १७ ऑक्टोबर देश विदेशातील नामवंत साहित्यिक,पत्रकार,व्याख्याते यांच्या उद्बोधक विचारांचा जागर होत आहे.

धर्माचे विज्ञान आणि विज्ञानाचा धर्म या विषयावर व्याख्यानात बोलताना डॉ.संग्राम पाटील म्हणाले की,तथागत बुद्धाने सांगितले तत्वज्ञान म्हणजेच २२ प्रतिज्ञा आहेत,चिंतनातून ज्ञान मिळविणे म्हणजे विज्ञान होय,धर्माचा वापर परीयत्ति आणि परीपट्टी नुसार व्हावा म्हणजे थेरी आणि प्रॅक्टिकल नुसार व्हावा जे धारण केले जाते तो त्याचा धर्म असतो ,दुःख मुक्तीचा मार्ग आर्यष्टांग पालन हाच आहे.मानवी तृष्णा नष्ट झाल्या तो व्यक्ती भगवान होतो.जो पर्यंत आपण धम्म धारण करत नाही,धम्माअनुकरन करत नाही तोवर आपण धर्मांतरित झालो असे म्हणता येणार नाही,तथागत बुद्धाचा जीवन मार्ग हा आचरणावर आधारलेला आहे असे मत डॉ.संग्राम पाटील यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थाने बामसेफ जिल्हा अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी डॉ.प्रमोद बिऱ्हाडे हे होते प्रास्ताविक मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळसर यांनी केले.तर सूत्रसंचलन मिलिंद गुंजाळसर,तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी (मुंबई) यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश खळे,शैलेंद्र वाघसर,सुभाष वाघेरेसर,अक्षय गरुड,प्रा,बाबासाहेब अहिरे,देविदास केदारे,,बाळासाहेब जाधव,सुभाष गांगुर्डे, महेंद्र पगारे,संजय पगारे,वनिता सरोदे-पगारे,अमीन शेख,नितीन केवटे,अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे,अखिल गांगुर्डे,प्रशिल शेजवळ,राजरत्न वाहुळ आदींनी परिश्रम घेतले.

आपला
शरद शेजवळ
निमंत्रक,प्रवर्तक
9822645706
मिलिंद गुंजाळ
समन्वयक
मुक्ती महोत्सव समिती,मुक्तीभूमी येवला

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED