आरमोरी पोलिसांनी २४ तासात १७०० नीपा देशी दारू,६०लिटर मोहादारू केली जप्त…

25

🔺२ चारचाकी वाहनासह ८ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत..

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.15ऑक्टोंबर):-विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात, आरमोरी पोलिसांनी तपासणी नाक्यावर नियोजनबद्ध, सुनियोजित सापळा रचून एका कारवाईत ९० मिली.मापाच्या १७०० निपा देशी दारू किंमत १ लाख व चार चाकी वाहन किंमत ५ लाख,आणि दुसऱ्या कारवाईत वासाळा या गावातून ६० लिटर मोहदारू किंमत ६० हजार चारचाकी वाहन किंमत दीड लाख, असा एकूण दोन चारचाकी वाहनासह एकूण आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची यशस्वी कारवाई आरमोरी पोलीसांनी केली आहे.

सदर कारवाईत संपूर्ण माहिती पोलिस सूत्रांकडून जाणून घेतली असता तिन आरोपींना अटक करून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मान.आरमोरी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. कालबांधे यांनी दिली आहे.कारवाईचा तपास पोलिस उप निरीक्षक भाग्यश्री शिंदे, आणि दुसऱ्या कारवाई चा तपास पोलिस उप निरीक्षक विजय शेडमाके यांच्या कडे सोपविण्यात आला आहे. आरमोरी पोलिसांनी ही धाडसी कारवाई केल्यामुळे आरमोरी शहरातील आणि परिसरातील अवैध दारुचा धंदे करणाऱ्या लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत कुठेही अवैध मार्गाने दारू विक्री , सट्टा पट्टी,जुगार दिसून आल्यास, गोपनीय माहिती पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक कालबांधे यांनी केले आहे. आरमोरी पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक काळबांधे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील आणि परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात पोलीसांना यश मिळत आहे.