आष्टी परीसरातील विधूत ट्रान्सफार्म उघडे

31

🔸महावितरण विभागाचे दुर्लक्ष

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी प्रतीनिधी)

चामोर्शी(दि.15ऑक्टोबर):-तालूकयातील आष्टी परीसरातील अनेक गावातील विधूत ट्रान्सफार्म कूलूपबंद नसल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना व लहान मुलांच्या जिवितास घोका निर्माण झाला आहे व सध्या आष्टी भागातील अनेक गावांत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच आष्टी परीसरातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत.

त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. ग्रामीण भागातील नागरिक काेणतीही तक्रार करीत नाहीत. याचा गैरफायदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून घेतला जात आहे. मेंटेनन्स करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या कडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन जनतेला त्रासातून सूटका करावी व जिवितास घोका आहे अशे ट्रांसफार्म कूलूपबंद करावे अशी मागणी आष्टी परीसरातील नागरिकांकडून होत आहे