ऑल इंडिया पँथर सेनेच्या हल्ला बोल आंदोलनाला यश

🔹चंद्रपूर दिक्षाभूमी वंदन करण्यास खुली

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.15ऑक्टोबर):- राज्य सरकारने सर्व धार्मिक उत्सव व मेळावे साजरे करण्यास मुभा दिली होती. मात्र बौद्धांची क्रांतीभुमी ही सरकारच्या डोक्यातला मुळव्याध सारखा कोरोना बाहेर आल्याने भिम अनुयायांना वंदन करण्यास रोखले होते.

सरकारच्या या बौद्ध विरोधी जातीय भुमिकेविरोधात दिक्षाभूमी खुली झाली पाहिजे म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ दिपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे यांच्या संघर्षातून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, उपाध्यक्ष त्यागीभाई, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, मुख्य सल्लागार संतोष डांगे, सुरेश नारनवरे, सारिका उराडे, पपीता जुनघरे, निशाल मेश्राम, सय्यद शब्बीर जागीरदार, आक्रोश खोब्रागडे, सुमित कांबळे अशा शेकडो भिमसैनिकांना घेऊन जिल्हा कचेरीवर हल्ला बोल आंदोलन दिनांक १३.१०.२०२१ ला केले होते. आज या आंदोलनाला यश आले आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की, सर्वांसाठी चंद्रपूर दिक्षाभूमी कोणत्याही नियम न ठेवता खुली केली आहे. सर्व भिम अनुयायांनी दिक्षाभुमीवर जावं आणी वंदन करावे.नागपूर दिक्षाभूमी खुली करण्यास ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे ढाण्या वाघ दिपकभाई केदार यांनी आक्रमक भुमिका घेऊन सरकारच डोकं ठिकाणावर आणलं, आणि वंदन करण्यास घुसले व शासन प्रशासनाला सांगितलं कोणालाही रोखू नये त्यानंतर नागपूर दिक्षाभूमी सर्वांसाठी खुली केली. आज ऑल इंडिया पँथर सेनेच्या आंदोलनाला यश आले असून दोन्हीही दिक्षाभूमी खुल्या केल्या आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED