निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी हातधुवा मोहिमेत सहभागी व्हावे

32

🔸मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद,यांचे आवाहन

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.१५ऑक्टोबर):-हा जागतीक हातधुवा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. अशुध्द किंवा अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे किंवा खाल्यामुळे अनेक जिवाणु आपल्या पोटात जात असतात आणि त्यातुण विविध प्रकारच्या आजारांणा आमंत्रण मिळत असते . म्हणुनच २००८ मध्ये स्टॉकहोम शहरात जागतिक पाणी सप्ताह हि परिषद भरली होती . तिथुन जागतिक हात धुवादिनाची सुरवात झाली . तसेच यासाठी सामान्य जनतेचासुध्दा सहभाग असावा यासाठी व्यापक जनप्रबोधन आवश्यक होते . यासाठी १५ ऑक्टोबर हा जागतीक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या

साठी आपले हात जेवणापूर्वी. बाळाला घास भरवताना , स्वयंपाकापुर्वी . पिण्याचे पाणी हाताळताणा , शौचावरुन आल्यावर साबणाने स्वच्छ धुवावेत . कोरोणासारख्या महामारीवर मात करण्यासाठीसुध्दा एकच उपाय म्हणजे आपले हात स्वच्छ धुवावेत,असे आवाहन केले आहे, या दिनाची या वर्षाची संकल्पणा आपले भविष्य आपल्या हातात चला सोबतीने पुढे जाऊया. शाळकरी मुलांना हाताच्या स्वच्छतेचे महत्व पटवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे . कारण मुलांमध्ये स्वच्छतेची जाणीव कमी प्रमाणात असते . त्यांच्यात जाणीव जागृती करणे गरजेचे आहे.

स्वच्छ हातोमे दम है असे म्हणत मागील २ वर्षापासुन कोरोनावर मात करण्यासाठी वारंवार साबनाने हात धुणे आवश्यक असल्याचे आपण पटवुन देत आलो आहोत . त्यामुळे जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतस्तर ते शाळेतील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे . ग्रामपंचायतस्तरावर सरपंच , ग्रामसेवक यांनी तर शाळेतील शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रमाणात हात धुण्याचे प्रात्यक्षीक करून गावातील नागरिक व शाळेतील मुलांना हात धुण्याची पध्दत समाजावून सांगावी व त्याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे . आरोग्यासंदर्भात हातांच्या स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हात धुवा दिन आपल्या निरोगी आरोग्यासाठी साजरा करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मा . मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . कुमार आशीर्वाद ( भाप्रसे ) यांनी केले आहे.