नेर येथील तरुण घेताय पांझरा नदीत पोहण्याचा आनंद

29

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.15ऑक्टोबर):-धुळे तालुक्यातील नेर येथील पांझरा नदी तुडुंब वाहत आहे. तसेच नदी काठी तरून घेताय नदीत पोहण्याचा आनंद. नेर येथील कोळी गल्ली नदी काठावर मोठा बंधारा बांधण्यात आलेला आहे तसेच बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तरुण दररोज घेताहेत पोहण्याचा आनंद. पांझरा नदीत नकट्या बंधारा येथे सुतार साडनी,आहेत.

यावर्षी मात्र १,२ वेळा नदीला पूर आल्याने सडनितून जोरात पाणी वाहत असते.मात्र तरुण या नकट्या बंधार्‍यावरून उड्या मारत पाण्यात पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. उड्या मारत दूरपर्यंत पोहत पोहत जात असतात व बंधाराच्या काठाला लटकून वर चढून परत उड्या मारत पोहण्याचा आनंद घेत असतात. तसेच पोहण्याकरिता नदी काठावर गर्दी मोठ्या प्रमाणात जमलेली असते.