झोतवाडे येथे दुसऱ्यांदा आढळला 8 फुटाचा आजगर

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.15ऑक्टोबर):- शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे येथील शेतकरी गुलाब बंडु सदाराव यांचे शेतातील विहीरीत साधारण 8 फुटाचा अजगर आढळून आल्याचे घटना घडली आहे.तसेच 10 दिवसापूर्वी त्यांच्याच विहिरीत 6.5 फुटाचा अजगर आढळुन आला होता. मात्र त्याला शिताफीने पकडण्यात आले होते. त्याताच चेतन रावल व शोएब मन्यार यांनी दिले भल्या मोठ्या अजगराला जीवदान..तेही खोल विहीरीत उतरून..
चेतन रावल व शोएब मन्यार यांनी दिले भल्या मोठ्या अजगराला जीवदान..तेही खोल विहीरीत उतरून..

वन्यजीव सरंक्षण संस्था नंदुरबार व नेचर कंझरवेशन फोरम एन जी ओ चे सदस्य सर्प मित्र चेतन रावल व शोएब मन्यार रा.दोंडाईचा यांनी विहीरीत पडलेल्या अजगरास दिले जिवदान. दिले झोतवाडे ता,शिंदखेडा येथील शेतकरी गुलाब बंडु सदाराव यांचे शेतातील विहीरीत साधारण पहिला 6.5 फुटाचा अजगर आढळुन आला होता. व दुसरा अजगर 8.5 फुटाचा होता व शिंदखेडातील सर्प मित्रांनी दुसरा अजगर पकडण्यात यश आले.

दोंडाईचा येथील सर्पमित्र शोएब मण्यार व चेतन रावल याच्या मार्गदर्शनाखाली बोलावले.सर्पमित्र शोएब मण्यार याने विहीरीत ऊतरून भल्या मोठ्या अजगरास शिताफीने पकडून पिशवीत जेरबंद केले.चेतन रावल याने सहकार्य केले. अजगराचे वय साधारणतः 4 ते 5 वर्ष आहे. अजगरास बाहेर काढून वन विभागाचे सर्प मित्रांनी वनमजुर दोंडाईचा, यांच्या उपस्थितीत दुसरा अजगरास त्यांचे अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED