उमरखेड येथे पैगंबर जयंतीनिमित्त दि .१७ला भव्य रक्तदान शिबिर

🔸युथ विंग ,जमाअत ए इस्लामी हिंदचा उपक्रम

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.15ऑक्टोबर):-शांतीदुत, मानवतेचे उध्दारक, इस्लामचे शेवटचे संदेष्टे पैगंबर मुहम्मद (सल्लम) यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युथ विंग, जमात-ए-इस्लामी हिंद या युवा संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .सदर शिबिर आठवडी बाजार उमरखेड येथे दिनांक 17 ऑक्टोबर रविवार ला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत संपन्न होणार आहे .

या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आनंद देऊळकर तहसीलदार तसेच अमोल माळवे ठाणेदार उपस्थित राहणार असून शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांच्या विशेष उपस्थित हे शिबिर संपन्न होणार आहे .

यामध्ये डॉ . रमेश मांडण,अधीक्षक उत्तरवार रुग्णालय, डॉ .विवेक पत्रे ,डॉ .किशोर राठोड, डॉ .एच.एस. धर्मकारे, डॉ .सऊद देशमुख, डॉ. आदित्य सौंदनकर, डॉ .श्रीकांत जयस्वाल, डॉ .एस.पी डोंगे ,डॉ . मोहम्मद गौस,डॉ . जुनेद खान, डॉ. आबिद खान, डॉ. फारूक अबरार, डॉ. अजमत जागीरदार,डॉ, शोएब खान, डॉ . मुशफीक हुसेन, डॉ . मुजम्मिल लाला, डॉ . स्वपनिल जीवने , आरिफ अबरार,काझी जहीरोद्दीन ,अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद, संतोष जिल्हेवार अध्यक्ष, रोटरी क्लब, शाहरुख पठाण, प्रवक्ता पुरोगामी युवा ब्रिगेड, मोहसीन राज, अध्यक्ष, मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टीस, दिपक ठाकरे अध्यक्ष , उद्देश सोशल फाऊंडेशन, फराज हुसेन, अध्यक्ष स्टुडेन्ट इस्लामीक ऑर्गनायझेशन ऑफ इंडीया, अ .रऊफ नदवी चेअरमन राहत अर्बन को . ऑप . सोसायटी, मुफ्ती इनामउल्ला खान आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे .

युथ विंग संघटनेचे अध्यक्ष मो. साबीर यांनी मागील वर्षी १०१ युनिट रक्त दान करण्यात आल्याचे सांगत , युवकांनी जास्तीत जास्त संख्येत रक्तदान करून मानवतेसाठीच्या या पुण्य कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 
©️ALL RIGHT RESERVED