सिल्लोड येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न !!

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

सिल्लाेड(दि.15ऑक्टोबर):- सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भागात सुरू झालेल्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.

यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, युवानेते अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, डॉ. संजय जामकर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, मारुती वराडे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, आसिफ बागवान, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर , मोईन पठाण, सुधाकर पाटील, जुम्मा खा पठाण , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हानिफ, मुश्ताक देशमुख आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED