“भिम आर्मी” जळगांव जिल्हा युनिटचा विस्तार व नविन पद नियुक्त्या

🔹धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन

✒️भुसावळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भुसावळ(दि.15ऑक्टोबर):-“भिम आर्मी” संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय प्रमुख भाई विनय रतन सिंह, राष्ट्रीय महासचिव भाई कमल सिंह वालिया, भाई मंजितसिंह नौटियाल यांच्या कार्याने प्रेरित होऊन असंख्य तरुण समाज कार्य करण्याच्या विचाराने “भिम आर्मी” भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेत सहभागी होत आहेत.

दि.१४ ऑक्टोबर २०२१ रोजी भुसावळ स्थित शासकीय विश्राम गृह येथे “भिम आर्मी” जळगांव जिल्हा प्रमुख गणेशभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वात व जिल्हा महासचिव श्रीकांत भाऊ वानखेडे, जिल्हा मुख्य-संघटक मा.विक्रम भाऊ प्रधान, जिल्हा संघटक डॉलीभाऊ वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश व पदनियुक्ती सोहळा पार पडला.

कार्यकर्मप्रसंगी महापुरुष्यांना वंदन करून नवीन पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले व
नवीन नियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम प्रसंगी, *”भिम आर्मी” जळगांव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा महासचिव मा.श्रीकांत भाऊ वानखेडे,जिल्हा मुख्य- संघटक विक्रम भाऊ प्रधान, जिल्हा संघटक मा.डॉली भाऊ वानखेडे, भुसावळ तालुका कार्यध्याक्ष महेश भाऊ सपकाळे, भुसावळ तालुका महासचिव राजू भाऊ इंगळे, नागेश भाऊ भालेराव, लक्ष्मण भाऊ सरदार,मा.मंगल भाऊ गायकवाड उपस्थित होते.

*#-नवनियुक्त पदाधिकारी….*
*(१)”भीम आर्मी” जळगाव जिल्हा उपसंघटक- मा.संदीप भाऊ सपकाळे.*
*(२)जळगाव जिल्हा उपसंघटक-मा.नरेश भाऊ बिराडे*
*(३)जळगाव जिल्हा उपसंघटक-मा. हेमराज भाऊ तायडे.*
*(४)भुसावळ तालुका सहसचिव-मा. विलास भाऊ सुरवाडे.*
*(५)भुसावळ तालुका सहसंघटक-मा. विशाल भाऊ वाघमारे.*
*(६)यावल तालुका उप प्रचार-प्रसिद्धी प्रमुख.मा.राहुल भाऊ जयकर.*

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED