सत्ता असो वा नसो : मराठा,ओबीसी आरक्षणासाठी लढत राहणार – पंकजा मुंडे

🔸तुमच्या ताकदीमुळे मला कोणी रोखू शकत नाही

✒️विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

पाटोदा(दि.15ऑगस्ट):-ओबीसी व मराठा आरक्षणावरून भांडणे लावण्याचे काम सुरू आहे.पण ओबीसी मराठा एकच आहे.मी दोन्ही प्रश्न लावून धरणार आहे.मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही,अशी ग्वाही माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात दिली.तसेच ओबीसींना न्याय मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही.मराठा आरक्षण भेटल्या शिवाय हार स्वीकारणार नाही अशी घोषणा ही यावेळी पंकजा यांनी केली.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या,दसरा मेळाव्याची परंपरा आहे.हा मेळावा भक्ती आणि शक्तीचा परंपरेचा आहे.मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांना फुले वाहिली.आई जशी दृष्ट काढते तशी मी तुमची पदराने दृष्ट काढली.आज राज्यात काय परिस्थिती आहे.तुमच्या शिवाय माझ कोण आहे.तुमच्यावर मी जीव ओवाळून टाकते अशा भावना पंकजा यांनी व्यक्त केल्या.तसेच गोपीनाथ मुंडे यांची शक्ती जिवंत ठेवण्याचे काम तुम्ही केले आहे.तुमच्या ताकदीमुळे मला कोणी रोखू शकत नाही असा विश्वास व्यक्त केला.तसेच सता नाही म्हणून मेळावा नको.मुंडे साहेबांनी मेळाव्याची परंपरा कधी मोडली नाही.

मी का मोडू? असा सवाल करून त्यांनी विरोधकांना इशारा ही दिला.गावागावात प्रार्थनालाय,रुग्णालये,शाळा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातुन स्वच्छ करा.असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरकारचे पॅकेज तोकडे आहे.उपाशी माणूस उपाशी आहे.ज्यांची पोट भरलेली आहे.त्यांचीच पोट आणखी मोठे होत आहेत.कोरोनात आम्हीही मदत केली.अतिवृष्टीत मुंडे आणि मी दौरे केले.सरकारने पॅकेज कमी दिले.ते तोकडे आहे.आणखी मोठे पॅकेज द्या.अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

‘गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय,मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही ‘ – महादेव जानकर
‘नेता विकत घेता येत नाही,बनवता येत नाही ते रक्तातच असावं लागतं.आज भगवानगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी पंकजा मुंडे,प्रितम मुंडे,रासपचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर,खा.सुजय विखे,आ.शिवाजी कर्डीले,आ.मोनिका राजळे,आ.सुरेश धस,मा.आ.भीमसेन धोंडे,विजय गोल्हार,केशवदादा आंधळे,सविताताई गोल्हार,ह.भ.प.राधाताई सानप,रामदास बडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.यावेळी महादेव जानकर यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली.’गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली,आता तुम्ही पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा.माझ्या कानात गोपीनाथ मुंडेंनी कुर्रर्र केलंय,मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही’,असं जानकर म्हणाले.मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही…यावेळी जानकर म्हणतात,’नेता विकत घेता येत नाही,बनवता येत नाही ते रक्तातच असावं लागतं.आरशासमोर भाषण केल्यानं कुणी नेता होत नाही.नेता व्हायला अक्कल लागते.भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचे नव्हते,ते सर्व जाती-धर्माचे होते.भगवान बाबांना जात नव्हती,तशी गोपीनाथ मुंडेंनाही जात नाही.गोपीनात मुंडे यांनी ऊस तोडणाऱ्या माणसाच्या हातात कोयता देण्याऐवजी त्याला आयपीएस,पीएसआय केलं.

गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता.त्यामुळे महादेव जानकर मेला तरी चालेल पण ताईची कधीच साथ सोडणार नाही.३१ मे रोजी गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय,’असं जानकर म्हणाले.नेता मिळणं अवघडं आहे.आजचा प्रोग्राम राजकीय नाही.हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे.आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही.नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे.मंत्री येतो आणि जातो,पण नेता कधी मरत नसतो.पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का?नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे.गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली.पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीर राहा,असंही आवाहन महादेव जानकर म्हणाले.

मायाळू पंकजा ताईचे आता दुर्गेचे रूप पहा,प्रीतम मुंडे यांनी दिले पुढील संकेत जेव्हा समाजात विषमता,अन्याय पसरतो तेव्हा देवी दुर्गेचे रूप घेऊन अन्याय संपवते,याचे आजचा विजयादशमी प्रतिक आहे,असा संदर्भ देत खा.प्रीतम मुंडे यांनी पंकजा ताईचे पालकमंत्री असताना मायाळू,सोज्वळ,सहनशील रूप पाहिले आहे आता दुर्गेचे रूप पहा असेच संकेत आज सावरगाव येथील दसरा मेळाव्यात दिले.खा.प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या,संत भगवान बाबांच्या जन्मभूमीतला हा दसरा मेळावा कोणत्या पक्षाचा मेळावा नाही.तर भगवान बाबांच्या भक्तांचा,सर्वसामान्य,वंचितांना ऊर्जा देणारा मेळावा आहे.आमचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा आशीर्वाद आहे.येथे आलेला प्रत्येक माणूस काही अपेक्षा घेऊन आला आहे.काही जणांनी मला विचारले मुंडे परिवारासाठी हा मेळावा महत्वाचा आहे.मी त्यांना सांगितले,मुंडे परिवार म्हणजे केवळ पंकजा किंवा प्रीतम मुंडे इतकाच नाही.इथे आलेल्या प्रत्येक जन मुंडे परिवारातील आहे.इथे आलेले सर्वजण आमची संपत्ती.आमच्या वडिलांनी सर्वसामान्यांना शक्ती दिली.हीच सर्वसामान्यांची संपत्ती त्यांनी आम्हाला दिली आहे.ज्याज्या वेळी तुम्ही संकटात असाल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत असेही खा.प्रीतम मुंडे म्हणाल्या.सदरील मेळाव्याचे बहारदार सुत्रसंचलन युवराज वायभासे यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED