दीक्षाभूमीवर केवळ लसीकरण झालेल्याना प्रवेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15ऑक्टोबर):-येथील पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या निमित्ताने १६ ऑक्टोबर रोजी केवळ लसीकरण झालेल्याना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण केंद्र राहणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्याला यंदा ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना महामारीच्या सावटामुळे मागील दोन वर्षापासून दीक्षाभूमीचे दार बंद होते. मात्र, सध्या नियमात शिथिलता आल्याने दीक्षाभूमीवर भीमसागर येण्याची शक्यता आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केवळ लसीकरण झालेल्यांच प्रवेश दिला जाणार आहे.

दीक्षाभूमीवरील परंपरंगत कार्यक्रम रद्द जरी झाले असले तरी शासनाने कोरोना नियमात शिथिलता दिल्याने धम्म दीक्षास्थळी जनता मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असल्याने आवश्यक ती व्यवस्था चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केली आहे. दीक्षाभूमीवर स्वयंसुरक्षेसाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करा, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED